धर्मा वानखडे यांना कला आणि सामाजिक कार्यासाठी डॉक्टरेट
◆मिररवृत्त
◆अमरावती
आयकॉनिक प्लेस अवार्ड कौन्सिल अंडरटेकिंग गव्हर्मेंट ऑफ इंडिया, तसेच निती आयोग, सूक्ष्म लघु उद्योग एवं मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने जिल्ह्याचे सुपुत्र धर्मा वानखडे
यांना कला आणि सामाजिक कार्यासाठी मानद
डॉक्टरेट ही पदवी नुकतीच बहाल करण्यात येत असल्याची घोषणा नुकतीच कौन्सिल तर्फे करण्यात आलेली आहे.पुढील महिन्यात दिल्ली येथील कार्यक्रमात त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल केलीजाणार आहे.
आरोग्य क्षेत्रात आरोग्य निरीक्षक या पदावर कार्यरत असणारे धर्मा वानखडे हे आपली नोकरी सांभाळून विविध सामाजिक, शैक्षणिक,आरोग्य या विषयावर लघुचित्रपट निर्माण करून समाजात जनजागृती चे काम करत आहेत. आणि त्यांनी आपल्या चित्रपटाचा जागतिक पातळीवर ठसा उमटवला आहे.त्यांच्या विविध चित्रपटाला अनेक इंटरनॅशनल पुरस्कार प्राप्त झाले असून, महाराष्ट्र शासनाचे सुद्धा पुरस्कार प्राप्त झालेले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या सर्व चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती स्वतः केली असून त्यामध्ये त्यांनी अभिनय सुद्धा केला आहे. त्यांना 2023 चा महाराष्ट्र शासनाचा आरोग्यरत्न पुरस्कार, डॉक्टर एपीजे अब्दुल रत्न पुरस्कार, इंडियन आयकॉन पुरस्कार,राष्ट्रीय कलागौरव पुरस्कार आणि अमरावती भूषण पुरस्कार त्यांना मिळालेले आहे. ते विविध सामाजिक संघटनेत कार्य करत असून, ह्युमन राइट्स कौन्सिल ऑफ इंडियाचे सुद्धा ते अध्यक्ष आहे. महाराष्ट्र सोशल फोरम, महाराष्ट्र राज्याचे संस्थापक,अध्यक्ष असून,
महाराष्ट्र राज्य आरोग्य सहाय्यक/ निरीक्षक कर्मचारी संघटनेचे संस्थापक,राज्याध्यक्ष सुद्धा आहे.त्यांच्या या कला आणि सामाजिक उल्लेखनीय कार्याची कॉन्सिल ने दखल घेऊन, डॉक्टरेट ही पदवी बहाल केलेली आहे.या मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्यामुळे,त्यांचे विविध सामाजिक,तसेच कर्मचारी संघटनेकडून सर्वच स्तरावरून अभिनंदन होत आहे.