एकायन इंग्लिश स्कूल असदपूर येथे कृष्णजनमाष्टमी उत्सवात साजरी
•
•मिरर वृत्त
•असदपूर प्रतिनिधी
गोविंद चॅरिटेबल सोसायटी अमरावती द्वारा संचालित एकयान इंग्लिश स्कूल असदपूरच्या प्रांगणात 26 ऑगस्ट, 2024 रोजी कृष्णजनमाष्टमी उत्सवात साजरी करण्यात आली. सदर प्रसंगी शालेय विद्यार्थ्यानी राधा आणि कृष्णाची उत्तम वेशभूषा करून संस्कृतीचा वारसा जोपासत विभिन्न साहित्याची सजावट करीत कला कौशल्य प्रदर्शित केले. प्रदर्शनातील सर्जनशीलता आणि प्रतिभा पाहून प्रत्येक श्रेणीत प्रोत्साहन पर विजेत्यांची निवड कारण्यात आली या मध्ये नर्सेरी मधून कु. तेजल अमोल तेलगोटे , जुनिअर केजी मधून कु. नव्या मंचीस गावंडे तसेच सीनीअर के जी मधून अधिराज आकाश गिरी यांची निवड करण्यात आली
सदर उपक्रम गोविंद चॅरिटेबल सोसायटी अमरावती चे अध्यक्ष तात्यासाहेब उर्फ अंबादास तायडे, सचिव डॉ. शीतल तायडे , एकायन इंग्लिश स्कूल असद्पूर च्या संचालिका डॉ स्मिता तायडे,सदस्य श्री. वैभव विलास तायडे यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. करीता कु.वैष्णवी ठाकरे कु. शिवानी ठाकूर कु. नियती गावंडे , सौ. योगीताताई नितनवरे यांनी परिश्रम घेतले.