spot_img

अमरावती जिल्हा वकील संघाची ३० रोजी निवडणूक, तिरंगी लढतीत ॲड.अतुल चुटके बाजी मारणार

अमरावती जिल्हा वकील संघाची ३० रोजी निवडणूक
तिरंगी लढतीत ॲड.अतुल चुटके बाजी मारणार

◆मिररवृत्त
◆अमरावती

अमरावती जिल्हा वकील संघाची निवडणूक येत्या ३० मार्च रोजी होऊ घातली असून या निवडणुकीत १३३३ वकील मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व कार्यकारिणी सदस्य अश्या विविध पदासाठी निवडणूक होत असून अध्यक्ष पदासाठी ॲड.अतुल चुटके,ॲड.नंदकिशोर कलंत्री व ॲड.विश्वास काळे यांच्यात तिरंगीलढत होत आहे. या तिरंगी लढतीत ॲड.अतुल चुटके यांना मिळणारा मतदारांचा प्रतिसाद बघता ते बाजी मारणार असे चित्र आहे.
वकिलांना आपले हक्क व अधिकार मिळवून देणाऱ्या अमरावती जिल्हा वकील संघाची निवडणूक एका दिवसावर येऊन ठेपली असून अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी ही निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवारांनी कंबर कसली आहे.अध्यक्षपदासाठी रिंगणात असलेल्या तीनही उमेदवारांनी वकील मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेतल्या असून यामध्ये ॲड.अतुल चुटके यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.अमरावती जिल्हा वकील संघाच्या निवडणूकित यावेळी परिवर्तनाची लाट निर्माण झाली असून यामध्ये ॲड.अतुल चुटके यांची जमेची बाजु असल्याचे सध्या तरी चित्र आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!