spot_img

मनपा आयुक्त देविदास पवार यांचे नियुक्ती रद्द प्रकरण, राज्य व केंद्राच्या सचिवांना उच्च न्यायालयाने बजावली नोटीस

मनपा आयुक्त देविदास पवार यांचे नियुक्ती रद्द प्रकरण

◆राज्य व केंद्राच्या सचिवांना उच्च न्यायालयाने बजावली नोटीस
◆शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी दाखल केली याचिका

◆मिररवृत्त
◆अमरावती

अमरावती मनपा आयुक्त देविदास पवार यांची बेकायदेशीर नियुक्ती रद्द करण्यात यावी यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली असून उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेत राज्याचे मुख्य सचिव तसेच केंद्र सरकारच्या श्रमिक व प्रशिक्षण विभागाच्या सचिवांना नोटीस बजावीत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहे.
अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त हे आयएएस संवर्गातील असावे अशी नियमात तरतूद असताना देखील राज्य सरकारने सर्व नियम धाब्यावर बसवीत मुख्याधिकारी संवर्गातील अधिकारी असलेले देविदास पवार यांची मनपा आयुक्त म्हणून नियुक्ती केली. बेकायदेशीररित्या करण्यात आलेली पवार यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी करीत तशी तक्रार राज्य सरकारकडे केली होती. अखेरीस सरकारने त्यांची बदली रद्द करीत कापडणीस यांची मनपा आयुक्त म्हणून नियुक्ती केली पण पवार यांनी मॅट मधून बदलीला स्थगनादेश मिळवीत ते आपल्या पदावर पुन्हा रुजू झाले. परिणामी सुनील खराटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. ही याचिका दाखल करून घेत न्यायमूर्ती नितीन सांबरे व न्यायमुर्ती अभय मंत्री यांनी राज्याचे मुख्य सचिव व केंद्र सरकारच्या सचिवांना नोटीस बजावीत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहे.

◆मुख्य सचिवांच्या टिप्पणीकडे दुर्लक्ष◆

अमरावती मनपा आयुक्त पदावर देविदास पवार यांची केलेली नियुक्ती राजकीय व नियमांच्या विरुद्ध आहे व त्यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याची टिप्पणी करीत तसा शेरा राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य सचिवांनी फाईलवर लिहिलेला होता . असे असताना देखील त्याकडे दुर्लक्ष करीत नगर विकास विभागाच्या सचिवांनी नियमांचे उल्लंघन करीत राजकीय नेत्याच्या शिफारशी व प्रभावाने पवार यांची आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली .न्यायालयाने या बाबीची गंभीर दखल घेत सचिवांना नोटीस बजावली आहहे

◆न्यायालयीन लढाई सुरू – खराटे◆
मनपा आयुक्त देविदास पवार यांची बेकायदेशीर बदली रद्द करण्यात यावी यासाठी आता न्यायालयीन लढाई सुरू झाली असून विविध पुराव्यांसह दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने स्वीकारत सचिवांना जबाब देण्यासाठी नोटीस बजावली आहे .पवार यांची नियुक्ती रद्द प्रकरणी न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त करीत लवकरात अमरावती मनपाला आयएएस दर्जाचा अधिकारी आयुक्त म्हणून लाभेल असेही याचिकाकर्ते शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी म्हटले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!