spot_img

माजी राज्यपाल कोश्यारींनी अनंत अंबानीकडून 15 कोटी घेतले निनावी पत्रात दावा;100 मुलेही ज्या शाळेत नाहीत त्यासाठी देणगी घेतल्याचा आरोप

माजी राज्यपाल कोश्यारींनी अनंत अंबानीकडून 15 कोटी घेतलेः

◆निनावी पत्रात दावा;100 मुलेही ज्या शाळेत नाहीत त्यासाठी देणगी घेतल्याचा आरोप

◆मिररवृत्त
◆मुंबई

महाराष्ट्र राज्याचे वादग्रस्त राहिलेले माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे एक एक कारनामे सध्या समोर येत आहेत. कोश्यारी यांच्या शिक्षण संस्थेला उद्योजक मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांच्याकडून तब्बल 15 कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मिळालेल्या निनावी पत्रात असा आरोप करण्यात आलेला आहे. दरम्यान, गलगली यांनी हे निनावी पत्र राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पाठवून चौकशीची मागण केली आहे. राज्यपाल या पदावर असताना एवढी मोठी रक्कम देणगी स्वरुपातच मिळाली का,याची संपूर्ण चौकशी व्हावी,असे त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, गलगली यांनी व्हिडिओ देखील जारी केला.

◆काय म्हटले निनावी पत्रात◆

निनावी पत्रात दावा करण्यात आला की, भगतसिंग कोश्यारीसारख्या माणसाने आपल्या पदाचा दुरुपयोग करून उत्तराखंड मधील एका शाळेच्या नावाने भरपूर माया गोळा केली आहे. 100 सुद्धा विद्यार्थी शिक्षण घेत नाहीत, अशा शाळेंकरिता कोट्यावधीच्या देणग्या गोळा केल्या आहेत. त्या पैशातून आपला पुतण्या दीपेन्दरसिंग कोश्यारी याच्यासाठी शाळेच्या आसपास भरपूर जमीन खरेदी करून तिथे रिसोर्ट चालू केले आहे.

अनंत अंबानी यांच्याकडून या शाळेसाठी 15 कोटी रुपये घेतले आहेत. शेर सिंग कार्की सरस्वती विहार, डिगरा मुवानी, चामू, कनालीछीना, पिथौरागढ उत्तराखंड देवस्थळी यांच्या नावाने भरपूर संपत्ती गोळा केली आहे. 2019 पूर्वी सस्थांना किती देणग्या मिळाल्या आणि 2009 ते 2023 या कालावधीत किती देणग्या मिळाल्या या तुलना सहज करता येऊ शकेल. Devbhumi Shiksha Prasar Samiti, Nainital Bank Haldwani Branch, Account No-0561000000000310 अशी माहिती आहे. याशिवाय SBI मधील एका खात्यातही अनेक व्यवहार केले गेले आहेत.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!