spot_img

महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे उद्या नामांकन दाखल करणार, दिग्गजांच्या उपस्थितीत करणार शक्तीप्रदर्शन

महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे उद्या नामांकन दाखल करणार

◆दिग्गजांच्या उपस्थितीत करणार शक्तीप्रदर्शन

◆मिररवृत्त
◆अमरावती

अमरावती लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बळवंत वानखडे आपला उमेदवारी अर्ज शनिवार दि.३० मार्च रोजी दुपारी १ वाजता दाखल करणार आहेत.येथील नेहरू मैदान येथून महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट सर्वच पक्षाच्या स्थानिक नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बळवंत वानखडे शक्तिप्रदर्शन करणार आहे.
आपल्या हक्काचा माणूस म्हणून संपूर्ण जिल्ह्यात सुपरिचित असलेले बळवंत वानखडे यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून बळवंत वानखडे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्यांच्या उमेदवारीने जिल्ह्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे. प्रामाणिक व होतकरू नेता म्हणून अल्पावधीतच त्यांनी नावलौकिक मिळविला असून त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावून शक्तिप्रदर्शन करणार आहेत.
बळवंत वानखडे यांच्या विजयाचा निर्धार घेऊन जिल्ह्यासह वरिष्ठ पातळीवरील अनेक नेते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शनिवारी उपस्थित राहतील.तब्बल दोन दशकानंतर काँग्रेस पक्षाला अमरावती लोकसभा मतदार संघ सुटलेला असून काँग्रेस कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह निर्माण झाला आहे. काँग्रेस, शिवसेना उबाठा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने बळवंत वानखडे यांच्या विजयासाठी कंबर कसली असून आजच्या होणाऱ्या शक्तिप्रदर्शनातुन विजयाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!