spot_img

डॉ. राहूल व डॉ. विभा हेगडे यांची शिवाजी शिक्षण संस्थेला भेट, संस्थेसोबत संशोधनाच्या क्षेत्रात काम करण्याचा व्यक्त केला मानस

डॉ. राहूल व डॉ. विभा हेगडे यांची शिवाजी शिक्षण संस्थेला भेट

◆संस्थेसोबत संशोधनाच्या क्षेत्रात काम करण्याचा व्यक्त केला मानस

◆मिररवृत्त
◆अमरावती

भारतीय जनता पक्षाच्या दंत शाखेचे महाराष्ट्र प्रमुख डॉ. राहूल हेगडे यांच्यासह त्यांच्या सुविद्य पत्नी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दंत विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. विभा राहुल हेगडे यांनी आज श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, स्वीकृत सदस्य नरेश पाटील, प्राचार्य अमोल महल्ले, संस्थेचे सचिव डॉ. वि.गो.ठाकरे उपस्थित होते.
डॉ. राहूल हेगडे आज अमरावती शहरात आले असता त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेला भेट दिली. यावेळी त्यांचे संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ तथा भाऊसाहेब देशमुख यांच्यावरील चरित्रग्रंथ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना संस्थेचे सचिव डॉ. ठाकरे यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. विदर्भातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेकडे के.जी टू पी.जी शिक्षण देणारी मोठी व्यवस्था आहे. देशात नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवत असताना नवसंशोधन तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीत दर्जात्मक वाढ करण्याच्या अनुषंगाने नवे शैक्षणिक करार तसेच संशोधनात्मक पावले उचलणे गरजेचे आहे. त्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, श्री शिवाजी शिक्षण संस्था तसेच इतर वैद्यकीय विद्याशाखांच्या समन्वयातून संशोधनात्मक वाटचालीत नवा करार करू असे डॉ. हेगडे यावेळी बोलताना म्हणाले.
डॉ. राहूल हेगडे हे डेंटल काऊंसील ऑफ इंडियाचे कार्यकारिणी सदस्य असून इंडियन असोसीएशन ऑफ पेडियाट्रिक डेंटिस्ट्री बोर्डाचे सदस्य आहेत. यासोबतच ते साऊथ एशियन असोसीएशन ऑफ पेडियाट्रिक डेंटिस्ट्रीचे देखील उपाध्यक्ष आहेत. लवकरच संस्थेसोबतच नवे संशोधन करार करण्याचा मानस यावेळी उभयतांनी व्यक्त केला. यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अधीक्षक जगदीश भांगे, भावना गावंडे, आशिष ईखे, वृषाली वानखडे, सौरभ निंभोरकर,श्रीमती माया भटकर, सम्राज्ञी ब्राह्मणकर,प्रफुल्ल घवळे, गौरव इंगळे आदींची उपस्थिती होती.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!