spot_img

जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड.विश्वास काळे विजयी , ॲड. एन.डी. राऊत यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड.विश्वास काळे विजयी

◆ॲड. एन.डी. राऊत यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

◆मिररवृत्त
◆अमरावती

अमरावती जिल्हा वकील संघाच्या कार्यकारिणी निवडीसाठी शनिवारी मतदान घेण्यात आले. १३३३ सदस्यांपैकी १ हजार १०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीचा निकाल रात्री उशीरा लागला. यात जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. विश्वास काळे हे विजयी झाले. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी ॲड. अतुल चुटके व माजी अध्यक्ष ॲड. नंदकिशोर कलंत्री यांचा पराभव केला. यासह उपाध्यपदी एन.डी. राऊत यांची अविरोध निवड करण्यात आली. जिल्हा वकील संघाच्या
निवडणुकीत उपाध्यक्षपदासाठी ॲड. आशीष लांडे व ॲड. नितीन राऊत यांची उमेदवारी दाखल होती. परंतु ऐनवेळी ॲड. आशीष लांडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने नितीन राऊत यांची उपाध्यक्षपदासाठी अविरोध निवड झाल्याची घोषणा मुख्य निवडणुक अधिकारी ॲड. उज्वल सोनोने यांनी केली. त्यानंतर अध्यक्षपदासाठी ॲड.अतुल चुटके, ॲड.नंदकिशोर कलंत्री, ॲड. व्ही. एस. काळे हे तीन उमेदवार रिंगणात होते. यात ॲड. व्ही. एस. काळे यांनी बाजी मारली. काळे हे ज्येष्ठ विधीज्ञ व संयमी तथा सुस्वभावी व्यक्तीमत्व आहे.सचिवपदी चंद्रसेन गुळसुंदरे हे विजयी झाले. त्यांनी ॲड. रमेश माळी व ॲड. मोहन मोरे यांचा पराभव केला. तसेच ग्रंथालय सचिव या पदाकरिता एकूण तीन नामांकन दाखल झाले होते. त्यापैकी ॲड. मोहन किल्लेकर व ॲड. प्रीती खंडारे या दोन उमेदवारांनी आपले नामांकन मागे घेतल्याने ॲड. मोहम्मद वसीम शेख यांची ग्रंथालय सचिव पदाकरिता अविरोध निवड झाली आहे. यासह कार्यकारिणी सदस्यपदी ॲड. सारिका भोंगाडे (६८५), ॲड. शाहू, चिखले (७०७), ॲड. गजानन गायकवाड (५९७), ॲड. सूरज जामठे (६११), ॲड. सोनाली महात्मे (७९२), ॲड. मांगल्य निर्मळ (५८४), अॅड. विक्रम सरवटकर (६५१), ॲड. पुरुषोत्तम वैद्य (५५७) हे सात उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. उज्जवल सोनोने यांनी जवाबदारी सांभाळली. तर ॲड. बी. एस. ताजी, ॲड. अतुल काकडे, निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. तसेच ॲड. सुधीर तायडे, ॲड. मुकेश देशमुख, ॲड, पंकज तावरे, ॲड. भूषण कोकाटे सहायक निवडणूक अधिकारी म्हणून जवाबदारी सांभाळली. ॲड. नरेश रोडगे, ॲड. विलास गावंडे,ॲड . निलेश जोशी, ॲड. भारती जाणे,ॲड . रजनी पच्छेल, ॲड. पायल गाडे, थोरात हे या निवडणुकीत सहायक म्हणून सहकार्य लाभले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!