spot_img

डॉ.नितीन धांडे यांची हॅट्रिक, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा अविरोध निवड

डॉ.नितीन धांडे यांची हॅट्रिक
विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा अविरोध निवड

◆उपाध्यक्षपदी ॲड.उदय देशमुख,कोषाध्यक्षपदी,प्रा.डॉ.हेमंत देशमुख,सचिवपदी युवराजसिंग चौधरी यांची निवड
◆मिररवृत्त
◆अमरावती

विदर्भातील नामांकित शिक्षण संस्था विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ.नितीन धांडे यांची तिसऱ्यांदा अविरोध निवड झाली असुन उपाध्यक्ष पदी ॲड उदय देशमुख,कोषाध्यक्षपदी
प्रा.डॉ. हेमंत देशमुख,सचिवपदी युवराजसिंगजी चौधरी,
व कार्यकारी सदस्यपदी नितीन हिवसे,डॉ पुनम चौधरी,प्रा.विनय गोहाड,पंकज देशमुख,गजानन काळे यांची अविरोध निवड झाली आहे
विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी महाराष्ट्रातील प्रतिष्ठित शिक्षण संस्था असुन,या संस्थेची स्थापना 1965 साली स्व.राम मेघे यांनी केली होती.2014 साली सर्वोच्च न्यायालयातील लढा जिंकून डॉ. नितीन धांडे अध्यक्षपदी विराजमान झाले होते.पुन्हा 2019 त्यांची अध्यक्षपदी निवड झाली होती.आज झालेल्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते.
डॉ.नितीन धांडे व नवनियुक्त कार्यकारिणीच्या निवडीमुळे सर्वत्र आनंद व्यक्त केला जातं आहे.संस्थेच्या या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य केले आहे.गेल्या दशकात संस्थेमध्ये विद्यार्थी केंद्रित योजना राबविण्यात आल्या आहेत.त्यामुळे महाविद्यालयाचा नामांकन आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर नाव झाले आहे.
संस्थेच्या महाविद्यालयात मोठया प्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या.सर्व महाविद्यालयात नॅक मानांकन करण्यासाठी प्रयत्न केला गेला.तसेच महाविद्यालयात संशोधना साठी राष्ट्रीय निधी मिळण्यासाठी मागील दशकात प्रयत्न करण्यात आले.नवनियुक्त कार्यकरिणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!