धर्मा वानखडे यांना दादासाहेब फाळके इंटरनॅशनल मोटिव्हेशनल अवॉर्ड
◆गोवा येथे पार पडला समारंभ
◆मिररवृत्त
◆अमरावती
एबीएम आणि आयएनएन फिल्म्स मुंबई प्रस्तुत दादासाहेब फाळके इंटरनॅशनल मोटिवेशनल अवॉर्ड 2024 नुकताच होटल पार्क प्राईम गोवा येथे कला व सांस्कृतिक क्रीडा मंत्री गोविंद गौडा यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला.भारतातील विविध प्रदेशातून फिल्म्स क्षेत्रातील विविध कलाकारांचा सन्मान सोहळा यावेळी पार पडला. महाराष्ट्रामधून फिल्म क्षेत्रात फिल्ममेकर डायरेक्टर,लेखक, अभिनेता म्हणून नावारूपास आलेले धर्मा वानखडे यांना फुग्गा,लालखून,एनसीडी,रानीबेटी,रेस,मै झुकेगा नही,चानकी सोकडा या आगळ्या वेगळ्या सामाजिक व आरोग्य विषयक असलेल्या फिल्म क्षेत्रातील उल्लेखनीय दिग्दर्शनाबाबत व ह्युमन राईट्स कॉन्सिल ऑफ इंडिया च्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत असल्याबाबत दादासाहेब फाळके इंटरनॅशनल मोटिवेशनल अवॉर्ड या नावाने ऍस्ट्रॉऑर्डीनरी फिल्म डायरेक्टर ऑफ द इयर 2024 या वर्षीचा अवॉर्ड प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार त्यांना कला व सांस्कृतिक क्रीडा मंत्री गोविंद गौडा, बॉलिवूड डायरेक्टर राकेश सावंत, बॉलिवूड ऍक्टर सपना वाधवा, फिल्ममेकर करण समर्थ, ऍक्टर सुदेश किनालेकर,फिल्ममेकर अमोल भगत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांचे फिल्म क्षेत्रातील मराठी हिंदी फिल्ममेकर व कलाकारांकडून कौतुक होत आहे.आणि लवकरच मोठ्या कलाकारांना घेऊन मराठी फिल्म करत असल्याचे त्यांनी सांगितले.