spot_img

शिवसेनेच्या आरोग्य शिबिरात हजारो रुग्णांची तपासणी व उपचार ,नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ,सावंगी मेघे येथील तज्ञ डॉक्टरांनी दिली सेवा

शिवसेनेच्या आरोग्य शिबिरात हजारो रुग्णांची तपासणी व उपचार

●नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
●सावंगी मेघे येथील तज्ञ डॉक्टरांनी दिली सेवा

●मिररवृत्त
●अमरावती

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती महोत्सवांतर्गत 27 जानेवारी रोजी शिवसेना आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात हजारो रुग्णांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले . शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांच्या पुढाकारातून पार पडलेल्या या आरोग्य शिबिरात सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या तज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली.
हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती महोत्सवाचे औचित्य साधून गोरगरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा मिळावी आणि उपचार व्हावे या उद्देशाने या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .साईनगर ,बेनाम चौक स्थित प्रांगणातील सभा मंडपात सकाळी नऊ वाजता अमरावती कारागृहाच्या अधीक्षक किर्ती चिंतामणी तसेच माजी नगरसेवक प्रदीप बाजड यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस हारार्पण करून व द्वीप प्रज्वलित करीत आरोग्य शिबिराचे उद्घाटन पार पडले .यावेळी आयोजक शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे व डॉक्टर प्रणिता खराटे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करीत प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजन मागील भूमिका विशद केली .यानंतर सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य समन्वयक राजेश गडेरिया यांच्या उपस्थितीत डॉक्टर शशांक गोटरकर ,डॉक्टर मनीषा दास ,डॉक्टर प्राजक्ता काळबांडे ,डॉक्टर चेतना राठी ,डॉक्टर श्रुतिका खापे, डॉक्टर व्ही शिवा या तज्ञ डॉक्टरांनी नोंदणी केलेल्या रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधी वितरित करण्यात आली. आरोग्य शिबिरात नेत्ररोग, अस्थिरोग ,स्त्रीरोग ,बालरोग ,कान, नाक, घसा त्वचारोग ,श्वसन विकार यासह विविध आजाराचे निदान करून रुग्णांवर शिबिरस्थळीच उपचार करण्यात आले .सोबतच काही रुग्णांच्या आवश्यक चाचण्या देखील यावेळी करण्यात आल्या. अमरावती, बडनेरा ,भातकुली आदी परिसरातील नागरिकांनी शिबिरात येऊन आपली तपासणी करून घेतली.या कार्यक्रमास विकास शेळके, प्रकाश तेटू, , सागर ढोके, निलेश सावळे, पंजाबराव तायवाडे, किसन लळे, विजय खंडारे, कुचीन कैथवास, राजू दारोकर, उमेश वाठ, प्रकाश बांते, संजय गव्हाळे, शाम शेरोळे, अंकुश लवणकार, शेखर घिमे, राजू अक्कलवार, रिंकू पंचवटे, योगेश साबळे, योगेश विजयकर, संदीप इंगोले, उमेश सेवक, प्रशांत ठेंगरे, अमोल डगवार, रामा सोळंके, महेश पवार, नितीन तारेकर, , मंगेश गाले, किशोर पवार, संजय शेटे, दिलीप मेटकर, उमेश घुरडे, दिगंबर मानकर, किशोर वडनेरे, अनिल काळे, मनोज भूतडा, नंदू काळे, गजानन गुजरे, सुनील राऊत, अनिल नंदनवार, व्यंकटेश इसोकार, संतोष किंदरले, अंकुश शेबे, सोज्वल फुटाणे, अक्रम पठाण, याहया खा पठाण, डॉ जुबेर, हाजी समीउल्ला खान, रुपेश सावरकर, असावरी देशमुख, मनीषा टेंभरे, वर्षा भोयर, ज्योती औगड, प्रतिभा बोपशेट्टी, पियुशिखा मोरे, जयश्री कुऱ्हेकर, अर्चना धामणे, ज्योती बांते, लक्ष्मी शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

●निवडक रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया●

आरोग्य तपासणी शिबिरात तपासणीसाठी आलेल्या काही रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. मोतीबिंदू ,हायड्रोसिल ,हर्निया आदी शस्त्रक्रियेसाठी निवडलेल्या रुग्णांवर सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक सुनील खराटे यांनी दिली .या रुग्णांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!