spot_img

संवाद साधण्याची कला म्हणजे भाषा-प्रा. डॉ.प्रफुल्ल गवई ,डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा

संवाद साधण्याची कला म्हणजे भाषा-प्रा. डॉ.प्रफुल्ल गवई

●डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा

●मिररवृत्त
●अमरावती

भावना जोडणारी, माणसाशी नातं सांगणारी भाषा म्हणजे मराठी भाषा होय.सहजतेने वापरली तर ती आपलीशी वाटते. संवाद साधण्याची कला म्हणजे भाषा असे प्रतिपादन प्रा. डॉ. प्रफुल्ल गवई यांनी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती येथे भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्ताने आयोजित कार्यक्रमात डॉ. प्रफुल्ल गवई मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख होत्या. यावेळी आपल्या भाषणातून मार्गदर्शन करताना डॉ.प्रफुल्ल गवई म्हणाले की मराठी भाषा लवचिक आहे. सर्वच भाषांना ती एक्सेप्ट करते. हृदयाला हृदयाशी जोडणारी मराठी भाषा आहे .भाषेमुळे व्यक्तीचे परिवर्तन होते.भाषेवरील आपले प्रेम कमी होता कामा नये जी भाषा संतांनी जोपासली ती मराठी भाषा आपण जोपासली पाहिजे. जोपर्यंत भाषा समजून घेतली जाणार नाही तोपर्यंत आपल्याला भाषेचे महत्त्व समजणार नाही. सहजतेने वापरली तर ती आपलीशी वाटते म्हणून सर्वांनीच आपल्या भाषेवर प्रेम करावे असे आवाहन प्रा. डॉ प्रफुल्ल गवई यांनी केले.
अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख यांनी आपल्या बोलीभाषासह तरुणाई सध्या वापरत असलेल्या नवीन प्रकारच्या भाषे बद्दल चिंता व्यक्त करून प्रमाणबद्ध भाषेमुळे आपली वकृत्व शैली देखील खुलते असे मार्गदर्शन केले. पाहुण्यांचे स्वागत डॉ. संजय भोगे, प्रा. डॉ.महेंद्र इंगोले, प्रफुल्ल घवळे यांनी केले. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ .अर्चना आखरे तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. भुंबर यांनी केले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!