spot_img

चांदूर बाजार तालुक्यात गुटखा विक्री व वाळू तस्करी थांबविण्यासाठी आंदोलन ,५फेब्रू. पासून गोपाल तिरमारे करणार अंनत्याग आंदोलन

चांदूर बाजार तालुक्यात गुटखा विक्री व वाळू तस्करी थांबविण्यासाठी आंदोलन

●५फेब्रू. पासून गोपाल तिरमारे करणार अंनत्याग आंदोलन

●चांदुर बाजार

चांदूर बाजार तालुक्यात अनेक ठिकाणी रेती घाटातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खन केल्या जात असून त्याची रात्रीच्या वेळेस अवैध वाहतूक करून शासनाच्या महसूलाचे नुकसान केल्या जात आहे. हि अत्यंत गंभीर बाब तलाठी, मंडळ अधिकारी व संबंधित महसुली अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिलेली असतांना सुद्धा जाणीवपूर्वक रेती चोरीच्या माध्यमातून होत असलेल्या महसुली नुकसानीकडे संबंधित अधिकारी व कर्मचारी हे दुर्लक्ष करीत आहे. यावरून असे लक्षात येते कि, तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या रेती तस्करीला मंडळ अधिकारी, तलाठी व संबंधित अधिकारी यांचे अभय असून मोठी आर्थिक उलाढाल यामधून नक्की होत आहे. करिता तालुक्यात ज्या मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या कार्यक्षेत्रात रेती तस्करी होत असल्याचे निदर्शनास येईल त्यांचे विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी तसेच तालुक्यात होत असलेली अवैध रेती उत्खनन व वाहतूक पूर्णतः बंद करण्यात यावी. तसेच राज्यात गुटखा विक्रीला बंदी असतानाही चांदूर बाजार तालुक्यात मात्र गुटख्याची खुले आम विक्री सुरु आहे. गुटखा तस्करी आणि गुटखा विक्रीला अभय दिले जात असल्याने गुटखा विक्री जोमात आणि अन्न औषध प्रशासन कोमात गेल्या सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात गुटखा विक्रीला बंदी आहे, परंतु चांदूर बाजार तालुक्यात राजरोसपणे गुटखा विक्री सुरु आहे. बाहेरून रात्री-अपरात्री येणाऱ्या गाड्यांतून गुटखा चांदूर बाजार तालुक्यातील प्रत्येक गाव खेड्यात व चौकाचौकात पोहचत आहे. गुटख्याची पोती स्थानिक विक्रेते दुचाकी-चारचाकीतून घेवून जातात तसेच चांदूर बाजारात काही ठिकाणी याचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवला जातो. हाच साठा काही दिवस तालुक्यातील गावोगावच्या विक्रेत्याकडे मागणीनुसार पोहोच केला जातो. तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये सहज पणे गुटखा उपलब्ध होत असल्याने गुटख्याच्या व्यसनाचे प्रमाणात वाढ होवून लहान मुलांसह तरुणांमध्ये कर्करोगाच्या आजारात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.
अन्न व औषध प्रशासनामार्फत गुटखा विक्रेत्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र अन्न प्रशासनाकडून कुठल्याही विक्रेत्यांवर सातत्याने कारवाई केल्याचे दिसून आले नाही. बेकायदा गुटख्याची विक्री सुरु असतांना अन्न औषध प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने यातून मोठी आर्थिक देवाण घेवाण होत असल्याचे नाकारता येत नाही.करिता चांदूर बाजार तालुक्यात होत असलेली गुटखा विक्री हि त्वरित पूर्णतः बंद करणे संदर्भात कारवाई करण्यात यावी अन्यथा चांदूर बाजार तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असलेली अवैध रेती उत्खनन व वाहतूक तसेच प्रतिबंधित गुटखा तस्करी पूर्णतः बंद नकेल्यास दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ पासून जयस्तंभ चौक चांदूर बाजार येथे आमरण अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे निवेदन गोपाल तिरमारे यांनी चांदूर बाजार चे तहसीलदार व ठाणेदार यांना दिले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!