spot_img

शिवचरित्रावर डॉ. प्रकाश वाघमारे यांचे व्याख्यान ,स्व. दत्तात्रय पुसदकर महाविद्यालयाचे आयोजन

शिवचरित्रावर डॉ. प्रकाश वाघमारे यांचे व्याख्यान

●स्व. दत्तात्रय पुसदकर महाविद्यालयाचे आयोजन

●मिररवृत्त
●नांदगाव पेठ

येथील स्व. दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून छत्रपती शिवरायांचे जीवन आणि कार्य या विषयावर हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील नारायणराव वाघमारे महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख तथा सुप्रसिद्ध शिवअभ्यासक डॉ. प्रकाश वाघमारे यांचे व्याख्यान संपन्न झाले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.पी.आर. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या व्याख्यानाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. राहूल वरवंटीकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शिवचरित्रावरील या व्याख्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ. गोविंद तिरमनवार यांनी प्रास्ताविकातून व्याख्यानाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट करीत वक्त्यांचा आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला . त्यानंतर प्रमुख वक्ते डॉ.प्रकाश वाघमारे यांनी आपल्या व्याख्यानातून शिवचरित्रातील विविध पैलूंचे अभ्यासपूर्ण विवेचन याप्रसंगी केले. सोबतच त्यांनी शिवरायांच्या अराजकीय क्षेत्रातील कामगिरीवर विशेषत्वाने प्रकाश टाकला. शिवाजी राजे खऱ्या अर्थाने सर्वसामान्य आणि सर्व जाती धर्मातील लोकांच्या हितासाठी कार्य करणारे लोककल्याणकारी राजे होते असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. व्याख्यानाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ. राहूल वरवंटीकर सर यांनीही याप्रसंगी विचार व्यक्त केले. व्याख्यानाचे अध्यक्ष डॉ. पी.आर. जाधव यांनी अध्यक्षीय मनोगतातून डॉ. प्रकाश वाघमारे यांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानाबद्दल त्यांचे विशेष आभार मानले आणि त्यांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानाने उपस्थितांच्या ज्ञानात भर पडल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. सुभाष पवार यांनी केले .या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रा. राजेश ब्राह्मणे, डॉ. श्रीकांत माहुलकर डॉ. सौ सुनीता बाळापुरे, डॉ. विकास अडलोक, डॉ .पंकज मोरे, डॉ.जगदीश हेंडवे ,प्रा. लुंबिनी गणवीर, राकेश कोरेकर,राहुल शेगावकर प्रा. दशरथ कुरुडे ,प्रा. अमर कोंडापलकुलवार, कविता बोरकर शिक्षकेतर कर्मचारी ज्ञानेश्वर बारस्कर ,रेखा पुसतकर, विनायक पावडे, दिलीप पारवे, अनिल शेवतकर, राहुल पांडे आणि विद्यार्थी उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!