spot_img

प्रा.अमाेल करमरकर ‘टाॅप १० टीपीओ ऑफ द इयर – २०२३’ पुरस्काराने सन्मानित

प्रा.अमाेल करमरकर ‘टाॅप १० टीपीओ ऑफ द इयर – २०२३’ पुरस्काराने सन्मानित
●हजाराे युवकांना राेजगारक्षम करण्याचा गौरव : शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव

●मिररवृत्त
●अमरावती

शिक्षणासाेबत राेजगाराची हमी हे आजच्या शिक्षणाची ओळख. त्याकरीता विविध अभ्यासक्रमावर भर दिल्या जात आहे. मात्र, औद्याेगिक क्षेत्र आणि शिक्षण यातील विकासाची कौशल्य प्रधान मनुष्यबळाची तफावत मागणी पेक्षा पुरवठा अधिक असल्याने विद्यार्थ्यांना अपेक्षीत यशापासून भरकटणारी ठरत हाेती. ही उणीव दूर करण्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट चा अवलंब अभियांत्रिकी व तंत्र शिक्षणामध्ये हाेत आहे. शिक्षण आणि औद्याेगिक क्षेत्राचा याेग्य समन्वय, याेग्य सांगड घालत विद्यार्थ्यांना औद्याेगिक क्षेत्राच्या अनुरूप प्रशिक्षणातून काैशल्य प्रधान करीत राेजगारक्षम करण्याची किमया अमरावती विभागातील तंत्र व अभियांत्रिकी शिक्षणातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व प्रा. अमाेल करमरकर यांनी साकारली आहे. आजवर ५ हजार ६०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षीत करून त्यांना खात्रिशीर राेजगार मिळवून देणारे प्रा. अमाेल करमरकर यांना नुकताच राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित लिडरशीप अच्युवमेंट अंतर्गत टाॅप-१० टीपीओ ऑफ द इयर – २०२३ गाेल्डन एम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

डायनर्जिक बिझनेस सोल्युशन प्रा. लि, द्वारे नुकताच मुंबई येथे पार पडलेल्या गाैरव साेहळ्यामध्ये शिक्षक-जी.काॅम कंपनीचे संचालक विवेक त्रीवेदी यांच्या हस्ते प्रा. अमाेल करमरकर यांना सन्मानित करण्यात आले. यापूर्वी करियर इनफ्ल्युन्सीयर-२०२२, बेस्ट टीपीओ महाराष्ट्र असे गाैरवशाली पुरस्कार पटकवणारे प्रा. अमाेल करमरकर यांना २०२३ च्या सन्मानित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मॅकॅनिकल इंजिनिअर, पाेस्ट ग्रज्युएट, प्राेडक्शन टेक्नाॅलाजी मॅनेजमेंट, एम.बी.ए मार्केटींग असे उच्च विद्या विभुषीत प्रा. अमाेल करमरकर यांनी विप्रो मिशन टेन एक्स सर्टिफाईड, आयबीएम सर्टिफाइड सॉफ्टवेअर इंजिनियर व सर्वाेत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून राज्याच्या अभियांत्रिकी व उच्च तंत्र शिक्षण क्षेत्रात ख्याती मिळवली आहे. मागील १८ वर्षांपासून इंटरनशीप इन्क्युबेशन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (आयआयआयटीपी) पदावर कार्यरत प्रा.अमाेल करमरकर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सर्टिफाइड सॉफ्ट स्किल ट्रेनर असून विद्यापीठाद्वारे मान्यता प्राप्त व्हाेकेशनल व बी-व्हाेक सारख्या अभ्यासक्रमांद्वारे आयटी, सायबर सिक्युरिटी, मॅकेनिकल, इलेक्ट्राॅनिक्स, आयओटी, जीआयएस शाखेतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून त्यांना खात्रिशीर रोजगार मिळवून दिला आहे.

अमरावती उच्च तंत्र व अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात गाेल्डन एम अचीव्हर म्हणुन प्रसिद्ध प्रा. अमाेल करकरकर यांनी श्री हनुनाम व्यायाम प्रसारक मंडळद्वारा संचालीत अभियांत्रिकी महाविद्यालय येथे मॅकॅनिकल, व्हाेकेशनल (आयआयआयटीपी) विभागप्रमुख, झुलेलाल इंडस्टी ऑफ टेक्नाॅलाॅजी नागपुर येथे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता आणि सध्या सुशीला सुर्यवंशी मॅनेजमेंट इंस्टीट्युट ऑफ टेक्नाॅलाॅजी अ‍ॅडव्हान्समेंट अमरावती येथे संचालक इंडस्ट्री रिलेशन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट पदावर कार्यरत आहेत. त्यांना मिळालेल्या गाैरवशाली राष्ट्रीयस्तरीय टाॅप-१० टीपीओ ऑफ द इअर-२०२३ पुरस्काराबद्दल श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, उपाध्यक्ष डाॅ. श्रीकांत चेंडके, सचिव प्रा. डाॅ. माधुरीताई चेंडके, झुलेलाल इंडस्टी ऑफ टेक्नाॅलाॅजी नागपुर चे संचालक महेश साधवानी, डाॅ. माधवी वैरागडे, प्राचार्य डाॅ. नरेंद्र बावने, सुशीला सुर्यवंशी मॅनेजमेंट इंस्टीट्युट ऑफ टेक्नाॅलाॅजी अ‍ॅडव्हान्समेंट अमरावतीच्या संचालीका स्मिता सुर्यवंशी, प्रा. दिनेश सुर्यवंशी, प्राचार्य डाॅ. पल्लवी मांडवगडे, डाॅ. ए.पी.जे अब्दुल कलाम महाविद्यालयाच्या प्राचार्य डाॅ. अरूणा काकडे यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!