spot_img

‘गाफील’चित्रपटाचा खा. नवनीत राणांच्या हस्ते ट्रेलर रिलीज,२ फेब्रुवारीला हा चित्रपट होणार महाराष्ट्रभर प्रदर्शित

‘गाफील’चित्रपटाचा खा. नवनीत राणांच्या हस्ते ट्रेलर रिलीज

●२ फेब्रुवारीला हा चित्रपट होणार महाराष्ट्रभर प्रदर्शित

●मिररवृत्त
●अमरावती

आदित्य या तरूणाच्या आयुष्यात होणाऱ्या गंभीर घटनांवर भाष्य करणाऱ्या ‘गाफील’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. यापूर्वी आलेल्या टीझरमुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावलेल्या असतानाच आता या ट्रेलरची एंट्री झाली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगवेगळ्या आशय-विषयाला धरून चित्रपट येत आहेत, ‘गाफील’ हा चित्रपटही त्यापैकीच एक असल्याचे ट्रेलरवरून जाणवत आहे. चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत रवी राणा उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते ट्रेलर लॉन्च करण्यात आला.स्थानिक एका खासगी हॉटेल मध्ये हा सोहळा पार पडला.
खा. नवनीत राणा या पूर्वीच्या कलाकार असल्याने आणि त्यांना कलेची जाण असल्याने, त्यांनी चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. मराठी माणसानेच मराठी चित्रपट डोक्यावर घेतला पाहिजे. मी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम केल्याने मला तिकडच्या प्रेक्षकांचा अनुभव आहे. ते लोक त्यांच्या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतात. तसाच आपण मराठी लोकांनीही दिला पाहिजे. आपल्या मातृभाषेतील कलाकृतींना आपणच प्रोत्साहन दिले पाहिजे, आणि जसे इतर भाषांतील चित्रपट जागतिक स्तरावर पुरस्कार मिळवतात, तसेच मराठी चित्रपटानेही त्या उंचीवर पोहोचले पाहिले आणि त्यासाठी मराठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे मत. खा. राणा यांनी व्यक्त केले.
धरती फिल्मस प्रस्तुत व निर्मित, मॅड आर्क पिक्चर्स सहनिर्मित ‘गाफील’ या चित्रपटाचे निर्माते मनोज भेंडे आणि आलेख अग्रवाल हे आहेत, तर मिलिंद अशोक ढोके हे चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक आहेत. 2 फेब्रुवारीला हा चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!