शेळीपालन: खाद्य आणि आहार व्यवस्थापन!
◆डॉ.प्रियंका तोंडे◆
शेळीपालन व्यवसायामध्ये साधारणपणे ६० ते ७० % खर्च आहार व्यवस्थापनावर होत असतो. त्याकरिता उत्पादन खर्च नियंत्रित ठेण्याकरिता खाद्य व आहार व्यवस्थापन यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. शेळीचे उत्पादन वाढविण्याकरिता संतुलित आहार अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे शेळीचे उत्पादन व उत्पादक उपयुक्त आयुष्य दोन्ही वाढण्यास मदत होते. आहाराचे दोन मुख्य प्रकार आहे एक म्हणजे पोषण आहार आणि दुसरे उत्पादन आहार. पोषण आहार ही शरीराची प्राथमिक गरज आहे. तिची पूर्तता झाल्यावरच आहारातील उर्वरित अन्नद्रव्य उत्पादन कार्यासाठी वापरली जातात, त्याला उत्पादन आहार असे म्हणतात. त्याचे प्रमाण उत्पादनाचा प्रकार (मांस, दूध, लोकर), प्रमाण (दैनंदिन उत्पादन) व गुणवत्ता (दुधातील स्निग्धांश) यावर अवलंबून असते. पोषण आहाराची पूर्तता केल्याशिवाय आहारातील अन्नद्रव्य उत्पादनासाठी उपलब्ध होत नाहीत. शेळ्या ह्या उत्पादनासाठीच जोपासल्या जात असल्यामुळे यांना शरीर पोषण व उत्पादनासाठी आहार द्यावा लागतो. त्यामुळे भाकड शेळ्या पेक्षा गाभण, दुभत्या शेळ्या, प्रजननातील नर, वाढत्या वयातील करडांना, वजनाच्या प्रमाणात अधिक आहाराची आवश्यक्ता असते.
●शेळ्यांची पचनसंस्था आणि कार्य●
शेळी हा रवंथ करणारा लघु प्राणी आहे. म्हणजेच एकदा खाल्लेले अन्न त्या पुन्हा तोडात चघळतात. रवंथ करणाऱ्या प्राण्याच्या पोटाचे चार भाग असतात त्यामध्ये,
१. कोठी पोट (Rumen)
२. जाळीदार पोट (Reticulum)
३. पडदे पोट (Omasum)
४. जठर पोट (Abomasum)
जन्मलेल्या करडांच्या संयक्त पोटामधील सर्व भागाची वाढ झालेली नसते. जन्मतः फक्त एकच पे (जठर पोट) अस्तीत्वात असते. त्यामुळे तंतुमय खाद्य पदार्थ, चारा, वैरणीचा अन्न म्हणून पुन उपयोग होऊ शकत नाही. याकरिता करडे दीड ते दोन महीने वयाच्या काळात फक्त दुधावर जोपास लागतात. या काळात करडांच्या संयुक्त पोटातील पहिल्या तीन भागाची (कोठी पोट, जाळीदार पेर पडदे पोट ) वाढ पूर्ण होऊन करडे रवंथ करण्यास सुरवात करतात. शेळ्यामध्ये चाऱ्यामधील अस सेल्युलोज हे अन्न घटक पचन करण्याची क्षमता असते आणि हा ऊर्जा मिळण्याचा मुख्य स्रोत
१. कोठी पोट (Rumen)
कोठी पोटातील अंबवण्याच्या व जैविकक्रिये व्दारे तंतुमय पदार्थ, पिष्टमय पदार्थ, प्रथिने व थोड़ा प्रमाणात स्निग्ध पदार्थाचे विघटन व पचन होते. या पचन क्रिये बरोबरच पाचक अन्नद्रवे (अस्कि स्निग्ध आम्ल, अमिनो आम्ल, अमोनिया वायु) पाणी व क्षाराचे कोठीपोटातील अंतस्त्वचे मन सूक्ष्म रक्त वाहिनेव्दारे, रक्तामध्ये शोषण केले जाते व द्रवरूप अन्न पुढे सरकत राहते. कोठीपोटमधं असलेले जिवाणू तंतुमय पदार्थ, पिष्टमय पदार्थ व नत्रयुक्त प्रथिनाचे विघटन व पचन करून असि स्निग्ध आम्ल, अमिनो आम्ल, अमोनिया वायु व ब-जीवनसत्व तयार करतात व याचा शेळयांन शरीर पोषणासाठी उपयोग होतो.
२. जाळीदार पोट (Reticulum)
जाळीदार पोटाचा आकार व क्षमता लहान असून त्याचे स्थान कोटी पोटाच्या समोरील तळ बाजून असते. चाऱ्यामधून कोठीपोटात आलेल्या जड वस्तु द्रवरूप चाऱ्यापासून वेगळे करण्याचे साम जाडीदार पोटाचे असते. त्यामुळे या पोटाला हार्डवेयर स्टमक असे सुध्दा म्हणतात.
३. पडदे पोट (Omasum)
पडदे पोट हे तिसरे पोट असून याचा आकार गोलाकार असतो, आतील आवरण पातळ पढायात बनलेले असते. पडदे पोटाचे मुख्य कार्य म्हणजे अन्नद्रव्यामधील पाणी शोषून घेणे.
४. जठर पोट (Abomasum)
जन्माच्या वेळी फक्त जठर पोट क्रियाशील असते, त्यामुळे याला खरे पोट असे म्हणतात. जहर पोटामध्ये तयार होणाऱ्या पाचक रसाव्दारे अन्नामधील, दुधामधील जवळजवळ सर्वच अन्नद्रवाचे (पिष्टमय, स्निग्ध व प्रथिने) विघटन व पचन होण्याचे कार्य या पोटामध्ये होते.
●शेळयांना आवश्यक पोषण अन्नघटकपक्ष●
शरीर पोषण व उत्पादनासाठी शेळयांना आहारामधून पोषण अन्नघटकाची वेगवेगळ्या प्रमाणात गर असते.
✓ प्रथिने (Protein)
✓ कर्बोदके (Carbohydrate)
✓ स्निग्ध पदार्थ (Fat)
✓ जीवनसत्वे (Vitamin A,D,E)
✓ खनिजे (Minerals)
✓ पाणी (Water)
सर्वच खाद्य पदार्थातील अन्नघटकाचे प्रमाण व गुणवत्ता सारखी नसते. जसे एकदल चारा खाद्य पदार्थामध्ये कर्बोदके तर तेलबिया व पेंड यामध्ये प्रथिने, स्निग्ध पदार्थाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे उत्पादनासाठी लागणाऱ्या अन्नघटकाच्या प्रमाणानुसार आहारातील खाद्य पदार्थाची निवड करावी लागते.
●शेळयांना द्यावयाच्या खाद्य पदार्थाचे पोषण मूल्य●
शेळयांच्या शरीरातील अन्नघटकाची पूर्तता करण्याकरिता विविध खाद्य पदार्थाचा वापर केला जात असून यामध्ये असलेले पोषण मूल्य व गुणधर्म याबाबत सविस्तर माहिती यामध्ये दिलेली आहे.
१. हिरवी वैरण
शेळ्याकरिता हिरवी वैरण एकदल व व्दिदल या दोन वर्गातील चारापिकांपासून प्राप्त होते. एकदल प्रकारातील हिरवी वैरण शरीर पोषण व उत्पादनासाठी उत्तम असते, यामध्ये सर्व अन्नघटकाचे प्रमाण चांगले असून कर्बोदकाचे प्रमाण अधिक असते. मका, ज्वारी, बाजरी, ओट, गवत प्रजाती हे चारा पिके एकदल या प्रकारामध्ये येतात. व्दिदल वर्गातील हिरवा चारा उत्पादनाकरिता अधिक चांगला असतो. यामध्ये कॅल्शियम क्षार तसेच प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. या प्रकारातील हिरवी वैरण जास्त वापरल्यास दैनंदिन शेळयांच्या आहारामधील खुराकाचे प्रमाण थोडे कमी करता येते. लसूण घास, बरशीम, दशरथ गवत, शेवरी, चवळी, स्टायलो इत्यादि चारा पिके हे व्दिदल वर्गामध्ये येतात.
२. वाळलेली वैरण
वाळलेल्या वैरणीमध्ये तंतुमय पदार्थ, विद्राव्य खनिज क्षार, जीवनसत्व ड चे प्रमाण अधिक तर प्रथिने, स्निग्ध पदार्थ, पिष्टमय पदार्थ, क्षार, जीवनसत्व अ चे प्रमाण कमी असते. त्यामुळे यामधील अन्नघटकाची पाचकता व उपलब्धता कमी असते. अशा वैरणीचा फक्त शरीर पोषणासाठीच उपयोग होतो. उत्पादन कार्यासाठी त्याचा उपयोग होत नाही. वाळलेल्या वैरणी मध्ये ज्वारीचा कडबा, बाजरीचे सरमाड, वाळलेला लसूण घास, हरभरा भुसा, भुईमुंग पाला, सोयाबीन भुसा, तूर भुसा, मूग भुसा इत्यादी प्रकारच्या चाऱ्याचा समावेश होतो.
३. झाड पाला
शेळयांच्या आहारामध्ये ५०% पेक्षा अधिक आडपाल्याचा हिरव्या चाऱ्यामध्ये समावेश होऊ शकतो यामध्ये सर्वच अन्नघटकाचे प्रमाण चांगले असते. त्यामळे हिरव्या चायाला पर्या म्हणून झाडपाला शेळयांच्या आहारामध्ये वापरला जातो. झाड पाल्यामध्ये कमी अधिक अपायकारक घटक असतात, त्यामळे त्यातील अन्नघटकाची पाचकता कमी असते. परत पोषणाकरिता झाडापाला उत्तम पर्याय आहे. अंजन, बोर, स्वाभूळ, चिच, खेजडी गमी, तुनी शेवगा, हादगा या वृक्षापासून चांगल्या पतीचा व शेळयांना उपयुक्त असा झाडपाला उपलब्ध
४. कडधांण्याचे उपपदार्थ
एकदल प्रकारच्या धांन्याचे उपपदार्थ जसे मका, ज्वारीचा भरडा, गव्हाचा कोंडा, ऊर्जा व स्फुरद क्षाराचे चांगले साधन आहे. शेळयांचे उत्पादन वाढविण्याकरिता त्याचा मुका वापर केला जातो. व्दिदल प्रकारच्या धान्याचे उपपदार्थ जसे तर कणी, उडीद कणी चवी तांदळाची
●हरबरा टरफल इ. चा वापर करतात●
५. तेलबियांची पेंड
तेलबिया जसे शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन, सरकी इ. ची पेंड हे प्रथिनांचे उत्तम साधन आहे. गाना कॅल्शियम क्षाराचे प्रमाण चांगले असते. शरीराची वाढ व दूध उत्पादन वाढविण्याकरिता गेला
खुराकामध्ये याचा वापर केला जातो.
६. संतुलीत आहार / खुराक
शेळयांच्या आहारामध्ये वरील एकाच प्रकारच्या खाद्य पदार्थाचा समावेश केल्यास, शेळयां शरीराच्या अन्नघटकाची गरज पूर्ण होऊ शकत नाही, शरीर प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होने आहारावरील खर्च वाढतो, शेळयांच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो, शेळयांची पुनरुत्पादन उत्पादन क्षमता कमी होते तसेच यकृत व मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होण्याची शक्यता इ त्यामुळे शेळयांना एकाच प्रकाराचे खाद्य न देता अनेक वर्गातील खाद्य प्रकाराचा शेळयांच्या दैन आहारामध्ये वापर केल्यास शरीराच्या गरजेनुसार अन्नघटकाचा पुरवठा होतो, आहाराची पाच्छ वाढते तसेच खाद्यावरील खर्च सुध्दा कमी होण्यास मदत होते. त्यामुळे वरील सर्व प्रकारानंन खाद्याचा एकत्रित वापर करून शेळ्याना संतुलित आहार दिल्यास निश्चितच फायद्याचे ठरू शकते
●शेळयांची आहार क्षमता●
शेळयांची आहार क्षमता त्यांच्या पचनसंस्थेची खाद्य पदार्थ हाताळण्याची क्षमता दर्शविते है त्यांच्या वजनाच्या तुलनेत, शुष्क चाऱ्याच्या स्वरुपात व्यक्त केली जाते. शेळयांची आहार सन्न शारीरिक वजनाच्या ३ ते ५ % एवढी असते. परंतु शेळयांच्या आहार क्षमतेमध्ये भौगोलिक परिस्थिती उत्पादनाचा प्रकार, शारीरिक अवस्था व उत्पादनाच्या गुणवत्तेनुसार फरक दिसून येतो. प्रकल हंगामात पुनरुत्पादन संस्थेची गर्भधारणा क्षमता वाढवून ऋतुचक्राला गती देण्यासाठी शेळयांन काळात २० ते २५ % अधिक आहाराची आवश्यकता असते. परंतु गाभण शेळयांच्या शेवट गाभण काळात, उदरपोटातील काही जागा गर्भाच्या वाढीमुळे व्यापली जाते त्यामुळे पचन संस्थांच आहार क्षमतेवर मर्यादा येतात. या काळातील वाढती अन्नद्रव्याची गरज लक्षात घेऊन गाभण शे शेवटच्या काळात पौष्टिक, पाचक, सकस आहार किंवा खुराकाच्या माध्यमातून अन्नद्रव्याचा पुरवठा करावा लागतो.ऊर्जा व प्रथिने ही आहारातील मुख्य घटकापैकी दोन घटक आहे.
◆डॉ.प्रियंका तोंडे,
प्रक्षेत्र व्यवस्थापक पुण्यश्लोक अहिल्यादेवी ‘ मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र पडेगांव (छत्रपती संभाजीनगर)