अमरावती चे मेरिट मँन संदीप मुर्तडकर इंस्टाग्राम वर वायरल
-2 दिवसात 6 लाख ४७ हजार युजर्सनी बघितला विडिओ
-व्हिडिओला विद्यार्थी व पालकांची पसंती
•मिरर वृत्त
•अमरावती (प्रतिनिधी)
आपल्या शिक्षणाच्या विशिष्ट शैलीने संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असलेले संदीप मुर्तडकर सर यांचा नवा व्हिडिओ चांगलाच गाजत आहे. सोशल मीडियावर तब्बल सहा लाख हून अधिक लोकांनी व्हिडिओ बघितल्यामुळे सोशल मीडियाच्या क्षेत्रात देखील मुर्तडकर गुरुजींनी आगळावेगळा विक्रम निर्माण केला आहे. या व्हिडिओला विशेष करून पालक व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.
संदीप मुरतळकर सर यांनी नुकताच सोशल मीडियावर अभ्यास लक्षात का राहत नाही हा व्हिडिओ टाकला होता या व्हिडिओला दोन दिवसात28 हजार लाईक,,,14 हजार पेक्षा जास्त शेअर….4 हजार पेक्षा जास्त डाऊनलोड करण्यात आला आहे….संदीप मुर्तडकर सर हे मेरिट मेकर प्रोजेक्ट चे संचालक असुन तेरा वर्षापासून हजारो विद्यार्थी व शिक्षकांना अभ्यास प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र भर विविध शाळांमध्ये जात असतात, हजारो विद्यार्थी व पालकांचे प्रेरणास्थान संदिप मुर्तडकर सर विद्यार्थ्यांना अभ्यास कसा केला पाहिजे तसेच नैराश्याच्या जाळ्यातून कसे बाहेर पडले पाहिजे अशा अनेक विषयांवर प्रशिक्षण घेतात… आँनलाईन च्या जमान्यात आज अनेक लोक रातोरात वायरल झाली परंतु संदीप सर आँनलाईन शिकवय नव्हते,एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी त्यांना विचारले कि तुम्ही आँनलाईन शिकवत नाहीत का? तेव्हा त्यांनी नाही असे उत्तर दिले तात्काळ एका विद्यार्थ्यांने इंस्टाग्रामवर संदिप सरांना जुळवून घेतले व सरांनी पहिलाच विडिओ अपलोड केला…त
यामध्ये *अभ्यास का लक्षात रहात नाही?* ह्या प्रश्नाचे एका मिनिटात अप्रतिम उत्तर दिले आणि बघता बढता तो विडिओ समाजमाध्यमावर महाराष्ट्र भर व्हायरल झाला.संदीप सर एक मेहनती व प्रामाणिक शिक्षक असुन विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी या साठी शाळांमध्ये सेमिनार व कार्यशाळा घेतात,एका शिक्षकाचा पहिलाच विडीओ एवढा वायरल होणे हि अमरावती जिल्ह्यासाठी खुप मोठी गोष्ट आहे. इंस्टाग्रामवर official Merit maker project या आय डी वर हा व्हिडिओ उपलब्ध आहे.तसेच यु ट्यूब वर सुद्धा वायरल झालेला व्हिडिओ बघु शकता. विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या उज्वल भविष्यासाठी कार्य करणाऱ्या संदीप मुर्ताळकर सरांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
खालील लिंक ओपन करून आपण संदीप मुर्तडकर यांचा वायरल व्हिडिओ पाहू शकता.
#education #instagram #study tips#Parents Role#Techers Role #confidence #inspiration #timemanagement
https://www.instagram.com/reel/C_MsA3Tq9rB/?igsh=Y3JydG44aXZndmJp