spot_img

नादुरुस्त उभ्या वाहनाला भरधाव दुचाकीची धडक,वृद्ध आईसह मुलगा ठार

नादुरुस्त उभ्या वाहनाला भरधाव दुचाकीची धडक,वृद्ध आईसह मुलगा ठार

●शिवणगाव उड्डाणपुला नजीकची घटना

●मिररवृत्त
●नांदगाव पेठ

अमरावती कडे येणाऱ्या भरधाव दुचाकीची उभ्या नादुरुस्त ट्रकला मागून धडक लागल्याने झालेल्या अपघातात वृद्ध आईसह मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजताच्या दरम्यान शिवणगाव येथील उड्डाणपुलाजवळ घडली. बेबी प्रल्हाद साबळे (६५) व दिनेश प्रल्हाद साबळे (४५) रा अनकवाडी ता. तिवसा असे घटनेतील मृतकांचे नाव असून घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होते आहे.
नागपूर येथुन कुटार घेऊन अमरावती कडे येणारा ट्रक क्र.एम एच ४०,ए.के.९५९५ शिवणगाव जवळ येताच ट्रकमध्ये बिघाड झाल्याने ट्रक उड्डाणपुलाजवळ रस्त्याच्या कडेला उभा होता दरम्यान दिनेश साबळे आपल्या आईला घेऊन दुचाकीने अमरावती कडे येत असतांना दुपारी साडे तीन वाजताच्या दरम्यान उभ्या असलेल्या ट्रक ला जबर धडक दिली.यामध्ये डोक्याला गंभीर इजा झाल्याने दिनेश साबळे यांचा जागीच मृत्यू झाला तर जखमी असलेल्या बेबी साबळे यांना ट्रकचालक व गावकऱ्यांनी तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले.घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.दरम्यान घटनेची माहिती कुटुंबियांना मिळताच त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. घटनेने अनकवाडी मध्ये शोककळा पसरली आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!