spot_img

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठविलेल्या श्रीराम मूर्तीचे अंजनगाव बारीत पूजन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठविलेल्या श्रीराम मूर्तीचे अंजनगाव बारीत पूजन

■मिररवृत्त
■अंजनगाव बारी

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुलोम संस्थेच्या वस्तीमित्रांकरिता पाठविलेल्या कोदंडधारी श्रीराममूर्तीचे पूजन मोठ्या उत्साहात वस्तीमित्र निलेश खडसे यांच्यावतीने अंजनगाव बारी येथे पार पडले.
अनुलोम संस्थेचे संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात काम चालते. संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते अनुलोमचे वस्तीमित्र म्हणून काम करतात. एक वस्तीमित्र त्यांच्या वस्तीतील पंधरा हजार लोकाचे नेतृत्व करतात. या सर्व सामाजिक क्षेत्रातील नेतृत्वाचा यथोचित सन्मान देवेंद्र फडणवीस यांनी श्रीराम मूर्ती पाठवून केला. अंजनवंगाव बारी वस्तीचे वस्तीमित्र निलेश खडसे यांनी मिरवणूक काढून श्रीराम मूर्तीचे स्वागत केले.यावेळी गावातील वातावरण राममय झाले होते. त्यानंतर स्थानिक शेतकरी भवन येथे श्रीराम मूर्ती पूजन व प्रदान सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच बाळासाहेब कुंभलकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून वसंत सोनार,राजू भिवगडे, चकुले, अनुलोम भागजनसेवक प्रशांत सिसोदिया, वस्तीमित्र निलेश खडसे हे होते. सर्वप्रथम प्रभू श्रीराम व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवर व महिला पुरुष यांच्याहस्ते श्रीराम मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले. त्यानंतर प्रभू श्रीराम यांची आरती करून प्रसाद वाटप करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वस्तीमित्र निलेश खडसे यांनी कोदंडधारी श्रीराममूर्ती प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुलोम भागजनसेवक प्रशांत सिसोदिया यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रोशन गभणे यांनी केले. कार्यक्रमाला गावातील महिला,पुरुष,व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित युवकांनी सेवा उपक्रम म्हणून गावातील स्मशानभूमी स्वच्छतेचा संकल्प केला.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!