spot_img

पार्डी येथे श्रीराम मूर्ती प्रदान सोहळा उत्साहात ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठविली श्रीराम मूर्ती

पार्डी येथे श्रीराम मूर्ती प्रदान सोहळा उत्साहात

■उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठविली श्रीराम मूर्ती

■मूर्तीची गावात मिरवणूक काढून भव्य स्वागत

■मिररवृत्त
■पार्डी

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुलोम संस्थेच्या वस्तीमित्रांकरिता पाठविलेल्या कोदंडधारी श्रीराममूर्तीचे पूजन मोठ्या उत्साहात वस्तीमित्र अमोल केतकर यांच्यावतीने पार्डी येथे पार पडले.
अनुलोम संस्थेचे संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात काम चालते. संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते अनुलोमचे वस्तीमित्र म्हणून काम करतात. एक वस्तीमित्र त्यांच्या वस्तीतील पंधरा हजार लोकाचे नेतृत्व करतात. या सर्व सामाजिक क्षेत्रातील नेतृत्वाचा यथोचित सन्मान देवेंद्र फडणवीस यांनी श्रीराम मूर्ती पाठवून केला आहे. पार्डी वस्तीचे वस्तीमित्र अमोल खडसे यांनी मिरवणूक काढून श्रीराम मूर्तीचे स्वागत केले.
यावेळी गावातील वातावरण राममय झाले होते. त्यानंतर वस्तीमित्र अमोल केतकर यांच्या घरी प्रभू श्रीराम मूर्ती पूजन व प्रदान सोहळा पार पडला. सर्वप्रथम प्रभू श्रीराम यांच्या कोदंडधारी मूर्तीचे आगमन करण्यात आले. दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवर व महिला पुरुष यांच्याहस्ते श्रीराम मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरां युवराज कडव, रवींद्र घरत, अक्षय कडव, आदित्य ठाकरे यांनी आपले मत व्यक्त केले. त्यानंतर प्रभू श्रीराम यांची आरती करून प्रसाद वाटप करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वस्तीमित्र अमोल केतकर यांना कोदंडधारी श्रीराममूर्ती प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुलोम भागजनसेवक प्रशांत सिसोदिया यांनी केले तसेच देवेंद्र फडणवीस यांनी वस्तीमित्राला पाठविलेल्या पत्राचे वाचन केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आशिष गोडे यांनी केले. कार्यक्रमाला गावातील महिला,पुरुष व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित युवकांनी २२ जानेवारीच्या कार्यक्रमाचे नियोजन केले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!