spot_img

नायलॉन मांजा विक्री करणाऱ्याला अटक

नायलॉन मांजा विक्री करणाऱ्याला अटक

■मिररवृत्त
■नांदगाव पेठ

पर्यावरणाला घातक असलेल्या नायलॉन मांजाची अनधिकृतपणे विक्री करणाऱ्या दुकानदारास नांदगाव पेठ पोलिसांनी आज अटक केली. फुटवेअरच्या दुकानात लपून छपून नायलॉन मांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्या अनुशंगाने पोलिसांनी सापळा रचून आरोपीला नायलॉन मांजासह अटक केली.
इर्शाद अहेमद खान लाल खान (29) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो शरबतपुरा येथील फॅन्सी फूटवेयर येथे नायलॉन मांजा विकत असल्याची माहिती पो.नि. प्रवीण काळे यांना मिळाली होती. प्रवीण काळे यांच्या मार्गदर्शनात पो.उ.नि.सुनील खंडारे ,स.पो.उ.नि. राजू काळे, यांनी फॅन्सी फूटवेअर याठिकाणी धाड टाकून प्रतिबंधित असलेला २५६० रुपयांचा नायलॉन मांजा पकडला.
आरोपी फूटवेअरच्या दुकानातून प्रतिबंधित असलेला नायलॉन मांजा विकत असल्याने नांदगाव पेठ पोलिसांनी आरोपी इर्शाद अहेमद खान लाल खान याच्यावर पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!