spot_img

पुण्यतिथी महोत्सव दरम्यान अफवा पसरवू नका, कायदेशीर कार्यवाही करण्याचा ठाणेदार काळे यांचा इशारा

पुण्यतिथी महोत्सव दरम्यान अफवा पसरवू नका

■कायदेशीर कार्यवाही करण्याचा ठाणेदार काळे यांचा इशारा

■मिररवृत्त
■नांदगाव पेठ

संत काशिनाथ बाबा पुण्यतिथी महोत्सवाला नवीन जागेवर गावातील काही नागरिकांनी विरोध केल्याच्या अफवा समाज माध्यमांवर पसरवून गावात शांतता भंग करण्याचा प्रयत्न होत असल्याने शुक्रवारी नांदगाव पेठ पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक घेऊन ठाणेदार प्रवीण काळे यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कार्यवाहीचा इशारा अफवा पसरविणाऱ्यांना दिला आहे.
संत काशिनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला दिवसेंदिवस गर्दी वाढत असल्याने नाफडे पेट्रोलपंप जवळ असलेली जागा संत काशिनाथ धामसाठी द्यावी अशी मागणी गेल्या तीन वर्षांपासून काशिनाथ भक्त करत आहेत. शासनाने भक्तांच्या मागणीची दखल न घेतल्याने अखेर त्या जागेवर पुण्यतिथी महोत्सवाचा मंडप तयार करण्यात आला व यावर्षीपासून पुण्यतिथी महोत्सव याच ठिकाणी होईल असा निश्चय सुद्धा भक्तांनी केला.
मात्र गावातील काही नागरिकांनी या पुण्यतिथी महोत्सवाला विरोध केल्याच्या अफवा समाजमाध्यमांवर पसरविल्याने गावातील वातावरण ढवळून निघाले शिवाय गावात अशांतता निर्माण होत आहे या अनुषंगाने शुक्रवारी नांदगाव पेठ पोलीसस्टेशन मध्ये पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक बोलावून नागरिकांना या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले शिवाय अश्या प्रकारचे लेखी किंवा तोंडी निवेदन सुद्धा उपलब्ध नसून समाजमाध्यमांवर खोट्या अफवा पसरविण्यात येत आहे. गावात होणाऱ्या संत काशिनाथ महाराज पुण्यतिथी महोत्सवाला कुणाचाही विरोध नसून गावातील सर्व समाज बांधव या कार्याला हातभार लावत आहे त्यामुळे यापुढे कोणत्याही अफवा असलेल्या पोस्ट समाजमाध्यमांवर आल्यास त्याविरोधात कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा सुद्धा ठाणेदार काळे यांनी दिला.
या बैठकिला शिवराजसिंह राठोड,नितीन हटवार,विपुल पालिवाल, संदीप यावले,प्रा.मोरेश्वर इंगळे शेषराव गावनेर,मंगेश गाडगे,राजेंद्र तुळे,मंगेश तायडे,विजय राऊत,संतोष गडेकर,अभिलाष मानेकर,दिनकर सुंदरकर,राजन देशमुख,श्रीधर राऊत,विजय कापडे, रुपेश पोटफोडे, सचिन हटवार, शे. तौसिफ शे.वजीर आदी समिती सदस्य उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!