spot_img

आशिष भाकरे यांच्या ‘अप्लाइड मराठी’ पुस्तकाचे प्रकाशन

आशिष भाकरे यांच्या ‘अप्लाइड मराठी’ पुस्तकाचे प्रकाशन

■मिररवृत्त
■अमरावती

शहरात स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणारे आशिष भाकरे यांच्या अप्लाइड मराठी पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पार पडले. महाराष्ट्र सरळसेवा या परीक्षांचे कंत्राट आयबीपीएस या कंपनीला दिले असून पुढे पुरवठा निरीक्षक, महानगरपालिका, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, महापारेषण अशा परीक्षा आयबीपीएस घेत आहे.
या परीक्षांच्या मराठीसाठी अमरावतीचे आशिष भाकरे सर यांनी त्यांचे अप्लाइड मराठी हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे. या पुस्तकामध्ये मराठी शुद्धलेखनाचे नियम, मराठी प्रमाणलेखन, वाक्यांचा योग्य क्रम लावा, शुद्ध – अशुद्ध शब्दांचे वाक्य ओळखा, नकारार्थी वाक्य, रिकाम्या जागा, वाक्यात सुधारणा करा, वाक्यातील चुकीचा भाग ओळखा, शब्दयोजना, आलंकारिक शब्द, सरावासाठी प्रश्न अशा सर्व प्रश्नांचा आणि उत्तरांचा समावेश आहे.
आयबीपीएसच्या हुबेहूब अभ्यासक्रमानुसार या पद्धतीने बनवलेलं महाराष्ट्रातील हे पहिलं पुस्तक आहे असा दावा लेखकाने केलेला आहे. पुस्तकाची मागणी संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे. १२ जानेवारीला पार पडलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भीम बारसे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून साहित्यिक वैभव भिवरकर यांची उपस्थिती होती. या सोहळ्याच्या यशस्वीकरिता पराग देशमुख, प्रतीक वानखडे, शशांक भगत, विक्रम धोटे, चंदन भाकरे यांनी मोलाची भूमिका पार पाडली.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!