spot_img

‘काशिनाथ धाम’ येथे उद्यापासून भक्तांची मांदियाळी ,संत काशिनाथ महाराज पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ

‘काशिनाथ धाम’ येथे उद्यापासून भक्तांची मांदियाळी

■संत काशिनाथ महाराज पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ

■मिररवृत्त
■नांदगाव पेठ

संत काशिनाथ बाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला उद्यापासून (दि.१५) प्रारंभ होणार आहे.नाफडे पेट्रोलपंप नजीक असलेल्या काशिनाथ धाम याठिकाणी भक्तांची मांदियाळी असणार आहे.पुण्यतिथी महोत्सवाचे हे १८ वे वर्ष असून यावर्षी पहिल्यांदाच नवीन आणि प्रशस्त जागेत हा महोत्सव होत असल्याने भक्तांमध्ये आनंद आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
विदर्भासह राज्यात असलेल्या भाविक भक्तांची या महोत्सवादरम्यान दर्शनासाठी रीघ लागणार असून हजारो भाविक या पुण्यतिथी महोत्सवात सामील होणार आहे.सप्ताहामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.दररोज हभप केशवदादा उखळीकर महाराज यांच्या यांच्या सुमधुर वाणीतील संगीतमय भागवत कथेचे भाविकांसाठी आयोजन करण्यात आले आहे.काशिनाथ महाराज यांच्या भव्य मंदिरावर रोषणाई करण्यात आली असून संपूर्ण परिसर भक्तिमय झालेला आहे.
दररोज सकाळी साडे पाच वाजता काकड आरतीने या धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.सकाळी ७ ते ९ आरती व संत काशिनाथ बाबा यांची प्रार्थना .दररोज सकाळी ९ ते १२ व ३ ते ६ दरम्यान हभप केशवदादा उखळीकर महाराज यांच्या यांच्या सुमधुर वाणीतील संगीतमय भागवत कथेचे भाविकांसाठी आयोजन करण्यात आले आहे.सायंकाळी हरिपाठ आणि सामुदायिक प्रार्थना होणार आहे.भक्तमंडळी स्वयंप्रेरणेने याठिकाणी सेवा देत आहे.

■१० हजार भाविकांची व्यवस्था■

नाफडे पेट्रोलपंप नजीक असलेल्या खुल्या जागेत पहिल्यांदा हा महोत्सव पार असल्यामुळे भाविकांमध्ये आनंद संचारला आहे. भाविकांनी एका दिवसात याठिकाणी मंडप उभारला असून दररोज दहा हजार भाविक कथेला उपस्थित राहू शकतील अशी व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

◆२२ जानेवारीला महाप्रसाद■

२२ जानेवारीला अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळा असल्याने देशभर उत्सव साजरा होणार आहे त्यामुळे संतनगरी नांदगाव पेठ येथे पुण्यतिथी महोत्सवानिमित्य महाप्रसाद वितरित होणार असल्याने भाविक भक्तांसाठी त्या दिवशी आनंदाची पर्वणीच ठरणार आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!