spot_img

एकाच रात्री बिझिलँड मधील दहा दुकाने फोडली ,६५ हजारांची रोकड लंपास

एकाच रात्री बिझिलँड मधील दहा दुकाने फोडली

■६५ हजारांची रोकड लंपास

■सीसीटीव्ही फुटेज वरून चोरट्यांचा शोध सुरू

■मिररवृत्त
■नांदगाव पेठ

एकाच रात्रीत चोरट्यांनी तब्बल दहा दुकाने फोडून रोकड लंपास केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. दहा दुकानांपैकी आठ दुकानांमधून ६५ हजार रुपयांची रोकड चोरट्यांच्या हाती लागली.नांदगाव पेठ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन श्वानपथकाद्वारे चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.घटनेत तीन जणांचा समावेश असून या प्रकारामुळे मात्र व्यापारीवर्गात दहशत निर्माण झाली आहे.
शनिवारी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास तीन चोरटे बिझिलँड मधील मागील बाजूने प्रवेश करून आतमध्ये शिरले.साया फॅशन, राजतीलक,प्रीतम फॅशन,हार्दिक अनेक्स, साई कृष्ण अप्रल,ज्योती पाईप, व्यंकटेश बॅग्स, श्याम पारवा,साहेब कोटसूट, महाराजा फॅशन, बिझिलँड कार्यालयाची शटर लोखंडी रॉड ने वाकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला यामध्ये आठ दुकानांमधून ६५ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली.रविवारी सकाळी व्यापारी जेव्हा दुकानात पोहचले तेव्हा त्यांना दुकानाचे शटर वाकलेले दिसले त्यामुळे त्यांनी तातडीने नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण काळे यांच्याशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला मात्र त्यानंतर उर्वरित नऊ दुकानदारांनी सुद्धा तक्रार केल्याने मोठी चोरी झाल्याचे निदर्शनास आले व पोलिसांनी श्वास पथक बोलावून चोरांचा सुगावा घेण्याचा प्रयत्न केला.दुकानाजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये तीन जणांचे चेहरे कैद झाले असून त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाची चक्रे आरंभली आहेत. मात्र वारंवार होणाऱ्या या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी वर्ग चिंतेत असून पोलिसांनी तातडीने कठोर पावले उचलावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!