spot_img

हिरूर पूर्णा येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी

हिरूर पूर्णा येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी

■मिररवृत्त
■चांदूरबाजार
■प्रदीप टेकाडे

चांदूरबाजार तालुक्यातील हिरूर पूर्णा येथे प्रहार रुग्ण सेवा समिती आरोग्य सेविका अमरावती विभाग तसेच जीवन आधार संस्थेच्या कार्यकर्त्या माला दीपक गवळी व पत्रकार संदीप वानखडे यांचे उपस्थितीत राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना माला गवळी व संदीप वानखडे यांनी गावकऱ्यांनी आपल्या घरातील जुने कपडे,चपला, पुस्तके व इतर रद्दी दान करण्याचे आवाहन केले.
जीवन आधार संस्था ही गरीब नागरिकांची संस्था असून ती कुठल्याही प्रकारचा पक्षवाद किंवा जातिवाद करत नसून रात्रंदिवस जीवन आधार संस्थेचे अध्यक्ष जीवन जवंजाळ तसेच सुयोग गोरले निस्वार्थ भावनेने कार्य करत आहे. त्यांच्या टीमला 1 रुपये दान करून गोरगरीब अनाथ यांची निस्वार्थ सेवा करण्याकरिता मदत करण्याचे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जगदंब युवा प्रतिष्ठान तसेच जगदंब कॅटरर्स चे संस्थापक अध्यक्ष लखन दीपक गवळी, तेजस खांडेकर ,अमर वानखडे ,कृष्णा चव्हाण, जित बिरे, वैभव पचारे, आदित्य वानखडे, विजय पचारे, तसेच गावातील महिला व पुरुष यांची उपस्थिती होती.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!