पत्नीच्या हत्येप्रकरणी आरोपी अश्विन खराटे निर्दोष मुक्त
●ऍड.प्रशांत भेलांडे यांचा युक्तिवाद
●मिररवृत्त
●अमरावती
अंड्याची भाजी का केली नाही म्हणून १२ मार्च २०१५ रोजी दारूच्या नशेत पतीने पत्नीला मारहाण करत अंगावर घासलेट टाकून पेटवून दिल्याने पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता या प्रकरणी आरोपी पती अश्विन साहेबराव खराटे,आदर्श नेहरू नगर अमरावती याच्याविरुद्ध न्यायालयात खटला सुरू होता मात्र ऍड. प्रशांत भेलांडे यांनी युक्तिवाद करत या प्रकरणामध्ये बयाणात असलेली तफावत न्यायालयासमक्ष मांडून आरोपी अश्विन खराटे याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
घटनेबाबत सविस्तर हकीकत अशी की,अश्विन खराटे व्यसनी असल्याने त्याचे वारंवार पत्नीशी वाद व्हायचे, अश्यातच १२ मार्च२०१५ रोजी अश्विन दुपारच्या सुमारास घरी आला असता अंड्याची भाजी का केली नाही म्हणून त्याने पत्नीशी वाद घातला व राग अनावर झाल्याने त्याने घासलेट टाकून पत्नीला पेटवून दिले. यामध्ये पत्नी ७२ टक्के जळाली होती.या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन मध्ये प्राथमिक ४९८,३०७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.कॉ.मदन बेलसरे यांनी याबाबत बयाण नोंदविण्यात आले होते.मात्र उपचारादरम्यान अश्विनच्या पत्नीचा मृत्यू झाल्याने नंतर ३०२ ही कलम वाढविण्यात आली होती. याप्रकरणी न्यायदंडाधिकारी यांनी १३ मार्चला बयाण नोंदविले होते परंतु वैद्यकीय अहवालानुसार रुग्ण १२ तारखेला बोलण्यास असमर्थ असल्याने सदर बयाण ग्राह्य धरल्या जाऊ शकत नसल्याचा युक्तिवाद ऍड प्रशांत भेलांडे यांनी केला.
शिवाय अश्विन चे हात व तोंड जळले असल्याने त्याने आपल्या पत्नीचा बचाव करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे अश्विन याने पत्नीला जाळून ठार मारले याबाबत कोणताही ठोस पुरावा नसल्याने न्यायालयासमक्ष युक्तिवाद करून सिद्ध करण्यात आले.न्यायालयाने दोन्ही पक्षाच्या बाजू समजून घेऊन ठोस पुरावा नसल्याने आरोपी अश्विन खराटे याची हत्येच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. ऍड.भेलांडे यांचे सह या प्रकरणात ऍड. रोहित उपाध्याय, ऍड, यश भेलांडे, ऍड.अजय भक्त, ऍड.अशोक कोकाटे यांनी सहकार्य केले.