spot_img

महिलांना अश्लील भाषेत बोलणाऱ्या गोल्डन फायबरच्या व्यवस्थापकाला शिवसेनेचा चोप

महिलांना अश्लील भाषेत बोलणाऱ्या गोल्डन फायबरच्या व्यवस्थापकाला शिवसेनेचा चोप

■पदाधिकाऱ्यांची व्यवस्थापकाला मारहाण

■मिररवृत्त
■नांदगाव पेठ

महिला कर्मचाऱ्यांना वारंवार अश्लील भाषेत बोलून महिलांचा अपमान करणाऱ्या गोल्डन फायबरच्या व्यवस्थापकाला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच चोप दिला.परप्रांतीय असणाऱ्या व्यवस्थापकाने शिवसेना पदाधिकाऱ्यांना कॅबिन मधून हाकलून लावण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थापक जे.एस. रावत याला प्रचंड मारहाण केली यावेळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र वेळीच पोलीस पोहचल्याने पुढील अनर्थ टळला.
घटनेची हकीकत अशी की, शिवसेनेच्या वतीने सोमवारी दुपारच्या सुमारास गोल्डब फायबर मध्ये कामगार संघटनेची स्थापना केली.सोमवारी सर्व पदाधिकारी व कामगार यांच्या उपस्थितीत फलक अनावरण करण्यात आले. मात्र व्यवस्थापक रावत हे कामगारांना संघटने मध्ये जाऊ नका असा दम भरत होते. दरम्यान फलक अनावरण कार्यक्रमानंतर शिवसेना पदाधिकारी अरुण पडोळे, संतोष बद्रे,वेदांत ताल्हन, महेंद्र गाडे,प्रफुल्ल तायडे यांनी व्यवस्थापक रावत यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली मात्र रावत यांनी भेटण्यास नकार दिला.तेव्हा काही महिलांनी व्यवस्थापक रावत हे आम्हाला अश्लील भाषेत शिवीगाळ करत असल्याची तक्रार केली.
यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी थेट कॅबिन गाठत रावत यांना याबाबत विचारणा केली.तर रावत यांनी पदाधिकाऱ्यांना कॅबिन मधून हाकलण्याचा प्रयत्न केला तेव्हा संतप्त पदाधिकाऱ्यांनी रावत यांना मारहाण करायला सुरुवात केली. या प्रकरणामुळे परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. नांदगाव पेठ पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.नांदगाव पेठ पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!