spot_img

कल्याण नगर येथे शिवमहापुराण कथेचे आयोजन

कल्याण नगर येथे शिवमहापुराण कथेचे आयोजन

◆रामाश्रयी सुश्री रामप्रियाजी करणार कथा वाचन

●मिररवृत्त
●अमरावती

परमहंस श्री संत बालयोगी गजानन बाबा यांच्या 63 व्या जन्मदिनानिमित्त कल्याण नगर येथे शिव महापुराण कथेचे आयोजन 4 डिसेंबर ते 11 डिसेंबर दरम्यान करण्यात आल्याची माहिती कार्यक्रमाचे मुख्य आयोजक शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी दिली.
कल्याण नगर येथील परमहंस श्री संत बालयोगी गजानन बाबा कथा मंडप येथे होणाऱ्या शिव महापुराण कथेचे वाचन आचार्य गुरुवर्य सुधांशुजी महाराज यांच्या कृपा पात्र शिष्य रामाश्रय सुश्री रामप्रियाजी माई या करणार आहेत.4 डिसेंबर ते 11 डिसेंबर दरम्यान दुपारी शिवमहापुराण कथा होणार असून चार डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता तीर्थस्थापना व अभिषेक होईल त्यानंतर भव्यदिंडी करण्यात येणार आहे. 11 डिसेंबर रोजी शिवमहापुराण कथेचा समारोप होणार असून या सप्ताहास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री संत बालयोगी गजानन बाबा संस्थान कल्याण नगर अमरावती व शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे,प्रशांत वानखडे, रमेशभाऊ काठोळे, हरिहर इंगोले, शंकरराव पांडे, प्रदीप देशमुख, संजय गेडाम, विजय गुप्ता, केतन मसतकर, राहुल पवार, चंदू बारड, संजय काळे, अनिल चितळे, चंदन लोंढे,
सुनील चितळे सुमित जयसिंगपूऱे पंकज पांडे विशाल भेंडे सुनील जगताप वैभव देशमुख संजय वाकडे
राहुल खंडार सुनील मसतकर ठाकरे काका रोहन चितळे बंटी यादव अनुराग किल्लेकर गजानन तायडे रामावत महाराज यांनी केले आहे.

●श्री विजय ग्रंथ पारायण सोहळा●

3 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता श्री विजय ग्रंथ पारायण सोहळा आयोजित करण्यात आला असून सुभदाताई मेटकर या श्री विजय ग्रंथाचे वाचन करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

●विदर्भ स्तरीय वारकरी दिंडी स्पर्धेचे आयोजन◆
शिवमहापुराण कथा सोहळ्याचे औचित्य साधून विदर्भस्तरीय वारकरी सांप्रदायिक दिंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चार डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता कल्याण नगर येथून दिंडी सोहळ्यास प्रारंभ होईल .अमरावती शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करीत सर्व दिंड्यांचे राजकमल चौकात गोल रिंगण आणि राजापेठ चौकात उभे रिंगण रंगणार आहे .या स्पर्धेत विदर्भातील विविध ठिकाणच्या वारकरी दिंड्या सहभागी होत आहे. या दिंड्यांमधून प्रथम येणाऱ्या दिंडीस 31 हजार रुपये, द्वितीय क्रमांकाच्या दिंडीस 21000 रुपये व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या दिंडीस 11 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट मृदंग वादक आणि गायकास देखील रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती सुनील खराटे यांनी दिली.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!