spot_img

मनिषा नागोने यांना आदर्श जिल्हा पोलिस पाटील पुरस्कार

मनिषा नागोने यांना आदर्श जिल्हा पोलिस पाटील पुरस्कार

●मिररवृत्त
●अमरावती

महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या अमरावती येथील स्नेहमिलन कार्यक्रमात यावली शहिद येथील पोलीस पाटील मनीषा नागोणे यांचा आदर्श पोलीस पाटील पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.मागील वर्षी त्यांनी विधवा महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता.समाजातील रूढी परंपरेला बाजूला ठेवून विधवा महिलांचा सन्मान आणि आदर महत्वाचा समजून त्यांनी हा उपक्रम राबविला होता. त्याच कार्यक्रमाची दखल घेत त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी पोलीस पाटील संघटनेचे राज्य अध्यक्ष महादेव नागरगोजे, अमरावती जिल्हाध्यक्ष राहुल उके,राज्य समन्वयक माऊली मूंडे,शिवसेनेचे पश्चिम विदर्भ समन्वयक आसावरी देशमुख,यवतमाळ जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रुपेश सावरकर,वर्धा जिल्हाध्यक्ष सागर खोंडे आदी मान्यवरांच्या हस्ते मनीषा नागोणे यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.यावेळी जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील या कार्यक्रमाला उपस्थित होते. मनीषा नागोणे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!