spot_img

BREAKING राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यूः रुग्णालयात दाखल होण्याआधीच गमावले प्राण, पोलिसांची माहिती

BREAKING राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यूः
रुग्णालयात दाखल होण्याआधीच गमावले प्राण, पोलिसांची माहिती

●मिररवृत्त
●मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर अज्ञात तरुणांनी गोळीबार केल्याची घटना समोर अली आहे. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. वांद्रे पूर्व भागातील खेरनगर येथील राम मंदिर परिसरात ही घटना घडली असल्याचे समजते. तीन ते चार तरूणांकडून बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला. गोळीबार झाल्यावर बाबा सिद्दीकी यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेतले असल्याचे समोर आले आहे.

फटाके वाजवत असताना हा गोळीबार झाला असल्याचे समजते. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लीलावती रुग्णालयात संपर्क साधून डॉक्टरांशी बाबा सिद्दीकी यांच्याविषयी चौकशी केली आहे. दरम्यान, लीलावती रुग्णालायचा परिसर कार्यकर्ते व समर्थकांनी भरला आहे. झिशान सिद्दीकी तसेच अभिनेता संजय दत्त लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत.

कशी घडली घटना?

बाबा सिद्धिकी 9.15 मिनिटांच्या दरम्यान कार्यालयातून बाहेर पडले. बाबा सिद्धीकी हे कार्यालयाजवळ फटाके वाजवत असताना गोळीबार झाल्याची माहिती आहे. फटाके फोडत असताना अचानक तीन जण गाडीतून उतरले, तोंडावर रुमाल बांधून हे तीन जण आले होते. त्यानंतर त्यांनी बाबा सिद्धिकी यांच्यावर तीन राऊंड फायर केले. बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळील राम मंदिराजवळ हा गोळीबार झाला. बाबा सिद्धिकी यांना एक गोळी लागल्यानंतर ते खाली कोसळले. त्यानंतर लोकांनी त्यांना लीलावती रुग्णालयात तातडीने दाखल केले. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतल्याची देखील माहिती आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!