परिवहन विभागाच्या कार्यालयावर तिवसा विधानसभा युवक काँग्रेसचा धडक मोर्चा
अधिकाऱ्यांच्या अनुपस्थिती व तुघलकी वसुलीवर विचारला जाब?
●मिररवृत्त
●अमरावती
अमरावतीच्या विभागीय परिवहन कार्यालयावर काल तिवसा विधानसभा युवक काँग्रेस व काँग्रेस कमिटीच्या वतीने परिवहन विभागाच्या माध्यमातून नागरिकांना व शेतकरी, भाजीपाला व्यावसायिक, वाहन चालकांना होत असलेल्या त्रासाबद्दल धडक मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते.यावेळी परिवहन विभागामार्फत छोट्या व्यावसायिक वाहन चालकांवर होत असलेल्या कारवाईदरम्यान मोठ्या ओव्हरलोड चालणाऱ्या गाड्यांवर परिवहन विभागाची डोळे झाक होते.
राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावरून वाहन गाव खेड्यातून निघाल्यावर ग्रामीण आणि शहरी अशा परिवहन विभागाच्या आणि वाहतूक पोलिसांच्या पठाणी वसुलीला नागरिकांना बळी पडावे लागत आहे.
सोबतच पासिंग साठी दीडशे किलोमीटर वरून आलेले मोठे वाहन त्यांचे कागदपत्र ऑनलाइन असताना त्यांना सत्यप्रत म मागितली जाते आणि हे वाहन परत पाठवले जाते.
ओव्हरलोड गाड्यांमुळे रस्त्यांची दूर्लक्ष होत आहे रस्त्याला खड्डे पडत आहे याकडे परिवहन विभाग सपशेल दुर्लक्ष करते जिल्ह्यात सुमारे 2000 ओव्हरलोड गाड्या चालतात याची माहिती परिवहन विभागाला चांगल्या प्रकारे आहे
परंतु शासनाने दिलेल्या वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता ही वसुली सुरू असल्याचा आरोप काँग्रेस कमिटीने केला आहे.
*परिवहन विभागाच्या कार्यालयामध्ये अनेक अधिकारी अनुपस्थितीत राहत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. गोवंश तस्करीच्या गाड्या सुद्धा ओव्हरलोड असतात गोवंश तस्करीच्या गाड्यांना नंबर प्लेट नसते ही बाब सुद्धा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना तसेच गोवंश तस्करी करणाऱ्या वाहनांवर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली*
श्री. देशमुख नामक अधिकारी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार असल्याने ते यवतमाळ मध्ये पाच दिवस व अमरावती मध्ये फक्त एकच दिवस वेळ देतात, आय एम इ लेवल चे अधिकारी परिवहन विभागात असताना त्यांना चार्ज का देण्यात येत नाही याबद्दल सुद्धा काँग्रेसने जाब विचारत, छोटे व्यवसाय करणाऱ्या तीन चाकी चार चाकी वाहनांना नाहक दंड न देता मोठ्या आणि ओव्हरलोड चालणाऱ्या गाड्यांना दंड देण्याची मागणी केली.
परिवहन कार्यालयाचा कारभार नियोजित न चालवल्यास याबाबत स्वातंत्र्य दिनापासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी झालेल्या सकारात्मक बैठकीत अधिकाऱ्यांना देण्यात आला.
या आंदोलनात व कार्यालय घेराव व बैठकीदरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती हरिषभाऊ मोरे, जिल्हा काँग्रेस सचिव विरेंद्रसिंग जाधव, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सतीशभाऊ गोटे, तिवसा तालुका काँग्रेस कार्याद्यक्ष तथा नगरसेवक वैभव स. वानखडे, खरेदी विक्री संघ अध्यक्ष पंकजभाऊ देशमुख, नगराध्यक्ष योगेश क. वानखडे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव रितेश पांडव, तिवसा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष शैलेशभाऊ काळबांडे, अमरावती तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एड. अमितभाऊ गावंडे, मोर्शी तालुका काँग्रेस अध्यक्ष रमेशभाऊ काळे, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष शेहजादभाई पटेल, शहर काँग्रेस अध्यक्ष सेतूभाऊ देशमुख, खरेदी विक्री संचालक प्रमोदराव देशमुख, सरपंच गजाननराव देशमुख, सरपंच नंदकिशोर पोलगावंडे, नगरसेवक अमर वानखडे, दिलीपभाऊ सोनवणे, मोर्शी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष पवन काळमेघ, प्रवीण कडू, प्रमोद राणे, आदित्य भुयार, सचिन वानखडे, श्रेयश तायवाडे, प्रणव गौरखेडे, अंकुश देशमुख,वैभव काकडे आकाश मकेश्वर, शुभम बोके आदी पदाधिकारी व त्रस्त नागरिक, वाहन चालक उपस्थित होते.