spot_img

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, उत्तम नगर, अमरावती येथे डॉ. एस. आर. रंगनाथन यांची 132 वी जयंती साजरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, उत्तम नगर, अमरावती येथे डॉ. एस. आर. रंगनाथन यांची 132 वी जयंती साजरी
•मिरर वृत्त
•अमरावती प्रतिनिधी

श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, उत्तम नगर, अमरावती येथे भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची 132 वी जयंती दिनांक ९/८/२०२४ शुक्रवार रोजी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.कमलाकर पायास तर प्रमुख पाहुने म्हणून डॉ. प्रविण चौधरी उपस्थित होते. ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. सुधिर बी. सांगोले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
ग्रंथालय हे केवळ पुस्तकांचे संग्रहालय न होता ती एक संस्था व्हावी, चळवळ व्हावी म्हणून अहोरात्र झिजणाऱ्या डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या कार्यावर यावेळी मान्यवरांनी प्रकाश टाकला.
ग्रंथालयांना जास्तीत जास्त लोकाभिमुख बनवणं, त्याचा फायदा सर्वसामान्यांना व्हावा यासाठी त्यांनी विशेष कार्य केले. त्यांच्या तत्त्वावरच ग्रंथालयशास्त्राचा पाया रचला गेला आहे, असे यावेळी सांगण्यात आले.कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रकाश बोबडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. अनिल पाचकुकडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज सुरवाडे यांनी सहकार्य केले.
भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची 13२ वी जयंती दिनांक ९/८/२०२४ शुक्रवार रोजी साजरी करण्यात आली. त्या निमित्याने महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी यांना webopac आणि mopac याचे एक दिवसीय वार्कशॉप घेण्यात आले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!