spot_img

राष्ट्रीय सेवा योजनेतून व्यक्तिमत्त्वांमध्ये सामाजिक संवेदनशीलता निर्माण होते. डॉ. डी .टी. इंगोले

राष्ट्रीय सेवा योजनेतून व्यक्तिमत्त्वांमध्ये सामाजिक संवेदनशीलता निर्माण होते. डॉ. डी .टी. इंगोले .
•मिरर वृत्त
•दारापुर प्रतिनिधी

श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित तक्षशिला महाविद्यालय दारापूर येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मल्लू पडवल है होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक व मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ. डी. टी. इंगोले उपस्थित होते. आपल्या भाषणामध्ये डॉ. इंगोले यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व समजून सांगितले महाविद्यालयीन विद्यार्थी दशेमध्ये राष्ट्रीय सेवा योजनाविद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करते. त्यामुळे पुढे समाजाला त्याचा उपयोग होतो , असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणादरम्यान केले. ते पुढे म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजनेचा स्थापनेचा उद्देश हा उच्च शिक्षणासोबतच प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करणे हा आहे. त्या दृष्टीने प्रत्येक उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी झाले पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ यशवंत हरणे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन बीए द्वितीय वर्गाचे विद्यार्थी यश पवार यांनी केले याप्रसंगी प्रमुख उपस्थित म्हणून श्री विश्वंभर मारके व श्री रुपेश कडू हजर होते त्यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पडवाल यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व अधोरेखित केले. याप्रसंगी मुख्य मार्गदर्शक डॉ. इंगोले सर यांचा अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला महिला कार्यक्रमाधिकारी डॉ सारिका दांडगे सहाय्य कार्यक्रम अधिकारी प्रा गंगाधर पांडे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग व स्वयंसेवक हजर होते. कार्यक्रमाची सांगता एनएसएस गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रेड रिबन क्लबच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!