प्रचारापूर्वी मवीआचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी घेतले अंबादेवीचे आशीर्वाद
◆मिररवृत्त
◆प्रतिनिधी
अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी अंबा नगरीची कुलस्वामिनी असलेल्या अंबादेवी आणि एकवीरा देवीचे आशीर्वाद घेऊन विजयाचे साकडे घातले. यावेळी माजी मंत्री आणि काँग्रेसच्या आमदार ॲड .यशोमती ठाकूर, माजी खासदार अनंत गुढे, माजी आमदार हर्षवर्धन देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
जनतेचा उमेदवार म्हणून जनसामान्यांमध्ये चर्चा असलेल्या महाविकासआघाडी तर्फे काँग्रेसचे आमदार बळवंत भाऊ वानखडे अमरावती लोकसभा मतदार संघाचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रचार करण्यापूर्वी बळवंत भाऊ वानखडे यांनी आंबा नगरीची कुलस्वामिनी असलेल्या अंबादेवी आणि श्री एकवीरा देवी यांचे दर्शन घेतले. तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांसह देवीची मनोभावे महाआरती केली. मतदार संघातील जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी यासाठी त्यांनी ग्रामदेवी अंबादेवीचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर आमदार ॲड.यशोमती ठाकूर, माजी खासदार अनंत गुढे, माजी आमदार हर्षवर्धन देशमुख, विलास इंगोले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी महाआरती करून एकवीरा देवीचे ही दर्शन घेतले. तसेच यावेळी बळवंत भाऊ वानखडे यांना विजयी करण्याचा निश्चय सर्वांनी एकमताने केला. यानंतर गोशाळा येथे जाऊन मान्यवरांनी गोमातेला गोडाचा प्रसादही भरवला. तसेच अमरावती येथे अत्यंत पौराणिक महत्त्व असलेल्या माता खिडकी येथील श्रीकृष्ण मंदिरात जाऊन तेथेही श्रीकृष्णाचे दर्शन करून आशीर्वाद घेतले. यावेळी बोलताना ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही कुलदेवतेच्या, ग्रामदेवतेच्या आशीर्वादाने केली जाते. अमरावती मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षांना उतराई होण्यासाठी आम्ही आज कुलदेवतेचे, ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करत आहोत. अमरावतीतील जनता निश्चितच त्यांच्यातील असलेल्या एका सर्वसामान्य नेत्याला विजयी करतील, असेही ठाकूर म्हणाल्या. तर यावेळी बोलताना महाविकास आघाडीचे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बळवंत भाऊ वानखडे म्हणाले की, दर्यापूर विधानसभा मतदारसंघात मी आमदार म्हणून काम करीत आहे जनतेने मला काम करण्याची संधी दिली. याचप्रमाणे आता अमरावती लोकसभा मतदारसंघातही जनता मला काम करण्याची निश्चितच संधी देईल आणि केवळ शो बाजी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देईल, त्यासाठीच आपण आई अंबादेवी आणि एकविरा देवीचे दर्शन घेऊन सुरुवात करत आहोत,असेही वानखडे यावेळी म्हणाले. यावेळी काँग्रेसच्या आमदार ॲड यशोमती ठाकूर, माजी खासदार अनंतराव गुढे, माजी आमदार सुनील देशमुख, बबलू देशमुख, बबलू शेखावत,सतिशदादा पारधी, प्रदिप राऊत, हेमंत देशमुख, विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, हरीश मोरे, भैय्या पवार, वीरेंद्र जगताप, कांचनमाला गावंडे, अंजलि ठाकरे, बंडू हिवसे, जयंतराव देशमुख ,श्रीकांत बोंडे, प्रमोद दाळु, अमित गावंडे, संगीता ठाकरे, आसावरी देशमुख तालुका अध्यक्ष प्रमोद भाउ दाळू ,रमेश दादा काळे, अमित भाऊ गावंडे,
कल्पना ताई दिवे, शिल्पा ताई हांडे, हरीश दादा मोरे, रितेश दादा पांडव यांच्या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.