spot_img

अमरावती जिल्हा वकील संघ निवडणूक ॲड.अतुल चुटके यांनी घातली मतदारांना साद

अमरावती जिल्हा वकील संघ निवडणूक
ॲड.अतुल चुटके यांनी घातली मतदारांना साद

◆मिररवृत्त
◆अमरावती

अमरावती जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली असून अध्यक्षपदाचे उमेदवार ॲड.अतुल चुटके यांनी नामांकन दाखल केल्यानंतर आता ते थेट मतदारांशी वैयक्तिक भेटी घेऊन अध्यक्षपदासाठी मतदान करण्याची साद घालत आहे. विशेष म्हणजे अनेक वकिलांनी त्यांना समर्थन दिले असून मतदार सुद्धा त्यांच्या पाठीशी असल्याचा त्यांचा दावा आहे.
अभ्यासू आणि वकिलांच्या पाठीशी उभे असणारे संविधानाचे पुरस्कर्ते ॲड.अतुल चुटके तब्बल २६ वर्षांपासून जिल्हा व सत्र न्यायालयात सेवा देत आहे.सर्वसान्यांना न्याय मिळावा यासाठी त्यांचा कायम प्रयत्न असतो शिवाय त्यांचे सहकारी असलेल्या वकिलांना सुद्धा कायदेशीर मदत व सहकार्य करायला ते तत्पर असतात.ॲड.अतुल चुटके यांच्या उमेदवारीने वकील संघाच्या निवडणुकीत रंगत आली असून या निवडणुकीत आपलाच विजय होईल असा त्यांचा आणि सहकाऱ्यांचा विश्वास आहे.
ॲड.चुटके यांच्या कामाची पद्धत वेगळी असून वकील संघाला त्यांच्यासारख्या व्यक्तीची गरज असल्याचे मत यावेळी अनेक मतदार व्यक्त करत आहेत. त्यांच्या या प्रचार कार्यात ॲड. बेग ( औद्योगिक न्यायालय ) ॲड.. पारडशिंगे ( धर्मदाय आयुक्त वकील संघ अध्यक्ष) ॲड. पाटील,ॲड. दिलीप वानखडे,ॲड. प्रदीप मांजरे,ॲड. अशोक जुनघरे, ॲड. प्रदीप प्रेमलवार,ॲड. जगदीश सोनारे (वरुड) ॲड. मनिष लबडे,ॲड. कु. प्रिया बोरकर , ॲड. अजय लुंकड , ॲड.निलकंठ तायडे , निलेश उत्तमकर, राधेय पावळे यांचेसह शेकडो वकील स्वयंस्फूर्तीने सहभागी आहेत.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!