spot_img

अमरावती जिल्हा वकील संघ निवडणूक ग्रंथालय सचिवपदी ॲड.मो. वसीम शेख बिनविरोध, दोन्ही उमेदवारांचे नामांकन मागे

अमरावती जिल्हा वकील संघ निवडणूक
ग्रंथालय सचिवपदी ॲड.मो. वसीम शेख बिनविरोध
दोन्ही उमेदवारांचे नामांकन मागे

◆मिररवृत्त
◆अमरावती

अमरावती जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत उमेदवारांनी आपापले नामांकन दाखल केल्यानंतर अखेरच्या दिवशी दोन उमेदवारांनी आपले नामांकन परत घेतल्याने जिल्हा वकील संघाच्या ग्रंथालय सचिवपदी ॲड.मो. वसीम शेख हे बिनविरोध निवडून आले आहेत.ॲड.परवेज खान यांचे सहकारी असलेले ॲड.वसीम शेख २०१६ मध्ये देखील कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत होते हे विशेष!
३० मार्च रोजी जिल्हा वकील संघाची निवडणूक पार पडत असून यासाठी वकील उमेदवारांनी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे. वकील संघाच्या ग्रंथालय सचिवपदी अखेरच्या दिवसापर्यंत ॲड.मो. वसीम शेख यांचेसह ॲड.प्रीती खंडारे व मोहन किल्लेकर यांनी नामांकन दाखल केले होते मात्र खंडारे व किल्लेकर यांनी आपले नामांकन मागे घेतल्याने यामध्ये ग्रंथालय सचिवपदी ॲड.मो. वसीम शेख यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. उज्ज्वल सोनोने यांनी जाहीर केले.
यावेळी ॲड.मो. वसीम शेख यांच्या बिनविरोध निवडीसाठी ॲड. प्रशांत देशपांडे , ॲड.शोहेब खान,ॲड.परवेज खान,ॲड.जिया खान,ॲड.दीप मिश्रा,ॲड.सय्यद खालीद अली,ॲड.शब्बीर एडवोकेट हरीश निंबाळकर एडवोकेट महेंद्र तायडे एडवोकेट शिरीष जाखड एडवोकेट महेंद्र चांडक एडवोकेट चेतन बुंदिले एडवोकेट एडवोकेट फराज खान एडवोकेट शेख सुलतान एडवोकेट पराग ठाकरे
हुसेन,ॲड.एन.आर. शहा, ॲड.अनिल जयस्वाल, ॲड.मोहसीन शेख, ॲड.परवेज खान, ॲड.मनीष शर्मा, ॲड.अमित सहारकर,ॲड.मुर्तुजा,सुमित शर्मा,ॲड.रियाज रुलानी,ॲड.अजहर नवाज, ॲड.शहजाद शेख आदींची भूमिका आणि सहकार्य मोलाचे ठरले. विजयी उमेदवाराचा यावेळी सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!