spot_img

आमदार बच्चू कडू मुंबई रवानाः नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध

आमदार बच्चू कडू मुंबई रवानाः नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध

◆अमरावतीच्या जागेसंदर्भात शिंदेंकडून नाराजी दूर करण्याचे प्रयत्न

◆मिररवृत्त
◆मुंबई

आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज बैठक होणार आहे. या बैठकीसाठी बच्चू कडू मुंबईला रवाना झाल्याची माहिती आहे. बच्चू कडू यांनी नवनीत राणांविरोधात अमरावतीमधून उमेदवार देण्याची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना भेटीचे निमंत्रण पाठवले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर आता खासदार नवनीत राणा आणि आमदार अबच्चू कडू यांच्यातील वाद निवळणार का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

◆बच्चू कडूंची नाराजी दूर होणार?◆

अमरावती लोकसभेसाठी प्रहार जनशक्ती पक्ष स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा आमदार बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी केली आहे. प्रहारला अमरावती मतदारसंघात चांगला उमेदवार मिळाला असून लवकरच त्याची घोषणा होईल, असे बच्चू कडू यांनी सांगितले होते. प्रहारचा उमेदवार दीड लाख मतांनी निवडून येईल असा दावाही बच्चू कडू यांनी केला होता. त्यामुळे बच्चू कडू हे महायुतीमधून बाहेर पडणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या.

◆नवनीत राणांना भाजपकडून उमेदवारी मिळणार?◆

तर आगामी लोकसभा निवडणूकीसाठी अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे. मात्र, महायुतीत असणारा प्रहार पक्ष नवनीत राणा यांच्या उमेदवारीच्या विरोधात आहे.प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी त्यांना विरोध दर्शवला आहे. त्यामुळे अमरावतीतून प्रहार पक्ष वेगळा उमेदवार देणार असल्याची घोषण बच्चू कडू यांनी केली.

◆नवनीत राणांची उमेदवारी मान्य नाही◆

नवनीत राणा आणि रवी राणा यांचा स्वभाव कार्यकर्त्यांना मान्य नाही. नवनीत राणा आणि रवी राणा कार्यकर्त्यांना धमकावतात, त्यांनी वारंवार आमच्यावर आरोप केले.त्यामुळे कार्यकर्ते त्यांचा प्रचार करण्यासाठी तयार नाहीत,त्यामुळे महायुतीकडून नवनीत राणांची उमेदवारी मान्य नाही,असे बच्चू कडू म्हणाले होते.

◆अनेक जागांवरून रस्सीखेच सुरू◆

दरम्यान, सध्या महायुतीमध्येही अनेक जागांवरून रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. यामध्ये अमरावतीसह नाशिकच्या जागेचाही समावेश आहे. त्यातच बच्चू कडू आणि नवनीत राणा यांच्यातील वाद पुन्हा एकदा विकोपाला गेल्याचे दिसत आहे. यामुळे या वादावर तोडगा काढत बच्चू कडू यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार बच्चू कडू यांना आज चर्चेसाठी बोलावलं आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!