spot_img

अमरावती जिल्हा वकील संघ निवडणूक ॲड.अतुल चुटके यांचे अध्यक्षपदासाठी नामांकन दाखल

अमरावती जिल्हा वकील संघ निवडणूक
ॲड.अतुल चुटके यांचे अध्यक्षपदासाठी नामांकन दाखल

◆मिररवृत्त
◆अमरावती

३० मार्च रोजी होणाऱ्या अमरावती जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू झाली असून प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत ॲड.अतुल वसंतराव चुटके यांनी उडी घेत अध्यक्षपदासाठी नामांकन दाखल केले आहे. वकिलीसह सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या ॲड.अतुल चुटके यांच्या नामांकनाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अनेक वर्षांपासून अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयात सेवा देणारे तसेच वकिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे ॲड.अतुल चुटके यांच्या एकंदरीत कार्यावर विश्वास टाकत सहकारी वकिलांनी त्यांना जिल्हा वकील संघाच्या निवडणूक रिंगणात उतरविले आहे.आपल्या हक्काचा आणि वकील संघाला न्याय देणारं व्यक्तिमत्व असल्याने अनेक वकिलांनी त्यांना अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला आहे.ॲड.अतुल चुटके यांचे एल.एल.एम पर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पोस्ट ग्रॅज्युएट टिचिंग डिपार्टमेंट ऑफ लॉ येथे सेवा दिली त्यांनतर डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय व विनायक विधी महाविद्यालय याठिकाणी प्राध्यापक म्हणून सेवा देत त्यांनी वकिली क्षेत्रात विद्यार्थी घडविण्याचे कार्य केले.
आपल्या ज्यूनिअर वकिलांना न्यायालयीन कामकाजासंदर्भात मार्गदर्शन व मदत करणे हा त्यांचा स्वभावगुण असून आजवर त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक वकील विविध संस्थांच्या पॅनलवर सेवा देत आहेत. अनेक वकील त्यांच्या पाठीशी असून आपल्या सहकाऱ्यांच्या बळावर त्यांनी अध्यक्षपदाची आपली उमेदवारी दाखल केलेली आहे. नामांकन दाखल करतेवेळी त्यांच्यासोबत ॲड. निलकंठ तायडे,ॲड . अजय लुंकड, ॲड. अक्षय खराते,ॲड . स्नेहलता आनंद ( गायकवाड), ॲड. सोनू पळसकर, ॲड. दीपिका पेंढारी, ॲड. सचिन पळसपगार,ॲड. संदीप पारवे , ॲड. प्रिया बोरकर , विजय जामोदकर व इतर सदस्य हजर होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!