spot_img

पेपरफुटीच्या प्रकरणातील तपास गुन्हे शाखेकडे ? ,प्रकरणात गुंतागुंत,तपास सुरूच

पेपरफुटीच्या प्रकरणातील तपास गुन्हे शाखेकडे ?
●प्रकरणात गुंतागुंत,तपास सुरूच

●मिररवृत्त
●नांदगाव पेठ

मृद व जलसंधारण विभागाच्या पेपरफुटी प्रकरणातील तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली. नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार हणमंत डोपेवाड आणि गुन्हे शाखा मिळून संयुक्त तपास करण्यात येत आहे.प्रकरणातील नक्कल पुरविणारे उच्चपदस्थ अधिकारी यांच्यावर अद्यापही कार्यवाही करण्यात आली नाही मात्र त्या अधिकाऱ्याच्या शोधात गुन्हे शाखा व नांदगाव पेठ पोलिसांनी शनिवारी पथक रवाना केले होते परंतु पथक रित्या हाताने परतले असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून प्राप्त झाली.
२१ फेब्रुवारी रोजी नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील ड्रीमलँड येथे एआरएन असोसिएट या परीक्षा केंद्रावर मृद व जलसंधारण विभागाची परीक्षा घेण्यात आली होती.याठिकाणी पेपर सुरू झाल्यानंतर यश कावरे या परिक्षार्थ्याला मृद व जलसंधारण विभागातील वर्ग दोन चे उच्चपदस्थ अधिकारी प्रशांत आवंदकर यांनी ओळखपत्रावर प्रश्नांची उत्तरे लिहून दिल्याने ते आजूबाजूच्या विद्यार्थ्यांनी बघितले व त्याठिकाणी गोंधळ घातला त्यानंतर नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार हणमंत डोपेवाड यांनी यश कावरे या परीक्षार्थीला ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही केली व त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले मात्र या प्रकरणातील मुख्य सुत्रधार व नक्कल पुरविणाऱ्या अधिकाऱ्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात न आल्याने राज्याच्या गोपनीय यंत्रणेचे कान टवकारले त्यामुळे हे प्रकरण गुन्हे शाखेकडे हस्तांतरित केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.
दरम्यान मृद व जलसंधारण विभागाच्या परीक्षेला बसलेल्या ईतर विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी व मृद व जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता निपाणे यांना निवेदन सादर करून ही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे.संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत या पेपरफुटीच्या प्रकरणाचा जाहीर निषेध केला.खा.अनिल बोंडे यांनी या प्रकरणी विद्यार्थ्यांची बाजू समजून घेत विद्यार्थ्यांना धीर दिला व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून या गंभीर प्रकरणाबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

◆तपास ठाणेदार डोपेवाडकडेच- पोलीस उपायुक्त◆

या प्रकरणी पोलीस उपायुक्त सागर पाटील यांचेशी संपर्क केला असता त्यांनी पेपरफुटीच्या प्रकरणातील तपास नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार हणमंत डोपेवाड यांचेकडे असल्याची माहिती दिली.मात्र गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास नसल्याची पुष्टी सुद्धा पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी केली आहे.

◆त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यास विलंब का?◆

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार व परिक्षार्थ्यास नक्कल पुरविणारे मृद व जलसंधारण विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रशांत आवंदकर यांच्यावर आद्यप गुन्हा दाखल न झाल्याने एनएसयुआय या विद्यार्थी संघटनेने आक्षेप घेतला असून त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यास पोलीस विलंब का करत आहे असा सवाल सुद्धा यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!