spot_img

बबलू शाह यांची प्रहारच्या बडनेरा शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती ,अमन गौरवे फ्रेजरपुरा प्रभाग प्रमुखपदी

बबलू शाह यांची प्रहारच्या बडनेरा शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती

●अमन गौरवे फ्रेजरपुरा प्रभाग प्रमुखपदी

●शेकडो कार्यकर्त्यांचा प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश

●मिररवृत्त
●अमरावती

आ.बच्चू कडू यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शेकडो कार्यकर्त्यांनी रविवारी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश घेतला. शहरप्रमुख बंटी रामटेके व जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू यांच्या उपस्थितीत बडनेरा येथील बबलू शाह व अमन गौरवे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश घेऊन पक्ष बळकट करण्याची शपथ घेतली. यावेळी बबलू शाह यांचेकडे बडनेरा शहर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली तर अमन गौरवे यांचेकडे फ्रेजरपुरा प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
रविवारी शासकीय विश्रागृह येथे प्रहार जनशक्ती पक्षाची बैठक पार पडली.बैठकीला शहरप्रमुख बंटी रामटेके व जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू यांची उपस्थिती होती. बैठकीमध्ये बबलू शाह यांची बडनेरा शहर उपाध्यक्ष (कामगार युनियन) व अमन गौरवे यांची फ्रेजरपुरा प्रभाग प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. बबलू शाह यांनी बच्चू कडू यांचे विचार घेऊन पक्षावाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करत, गोरगरीब, निराधार, व रुग्णसेवा करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.तर बबलू शाह व अमन गौरवे यांच्या नियुक्तीमुळे पक्षाला देखील बळकटी मिळेल असा आशावाद बंटी रामटेके यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा महासचिव अकबरभाई, वलगावचे सरपंच सुधीर उगले, संपर्क प्रमुख गोलू पाटील, शहर संघटक श्याम इंगळे, शहर महासचिव अभिजीत गोंडाणे, शहर सचिव आशिष राजनेकर, उपमहानगर प्रमुख सुधीर मानके, रावसाहेब गोंडाणे बडनेरा शहर प्रमुख योगेश कावरे, शहर उपाध्यक्ष समीरभाई, वृषभ मोहोड, आकाश गजभिये, मनीष पवार, जावेदभाई, रिजवानभाई, शेषराव धुळे, विक्रम जाधव, अजय तायडे, कुणाल खंडारे, सचिन सवाई, धीरज पिंजरकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!