spot_img

अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या गट-क संवर्गातील परीक्षा केंद्रात बदल

अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या गट-क संवर्गातील परीक्षा केंद्रात बदल

●मिररवृत्त
●अमरावती

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत गट-क संवर्गातील एकूण ३४५ पदांच्या भरती प्रक्रिया आय.बी.पी.एस. मार्फत दि.२६ ते २९ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या परिक्षेकरिता निश्चित करण्यात आलेल्या परीक्षा केंद्रात बदल करण्यात आले असून ते याप्रमाणे ऐआरएन (ARN) असोसिएट’ड्रीमलँड रेडीमेड, नागपूर महामार्ग, अमरावती या केंद्रात बदल होऊन नवीन केंद्र तक्षशिला पॉलिटेक्निक, यशोदा नगर, महादेव खोरी रोड, अमरावती, महाराष्ट्र ४४४६०६ येथे निश्चित करण्यात आले आहे. तरी सर्व परिक्षार्थांनी नोंद घेण्याचे आवाहन, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी केले आहे.
२१ फेब्रुवारी रोजी ड्रीमलँड मधील एआरएन असोसिएट याठिकाणी मृद व जलसंधारण विभागाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याने शासनाच्या वतीने सदर परीक्षा केंद्र रद्द केल्याची माहिती आहे.याठिकाणी गोंधळ झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला होता त्या अनुषंगाने शासनाच्या वतीने परीक्षा केंद्र रद्द करून नवीन केंद्र तक्षशिला पॉलिटेक्निक, यशोदा नगर, महादेव खोरी रोड, अमरावती हे नेमले आहे. विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी अशी विनंती करण्यात येत आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!