spot_img

सेवानिवृत्त अभियंता प्रकाश राऊत यांचे निधन , आज हिंदू स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

सेवानिवृत्त अभियंता प्रकाश राऊत यांचे निधन

●आज हिंदू स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

●मिररवृत्त
●अमरावती

सावकलाल समाजातील प्रतिष्ठित नागरिक तथा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामधून सेवानिवृत्त झालेले अभियंता प्रकाश नामदेवराव राऊत यांचे रविवारी रात्री वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. अनेकांना मदत करणारे तसेच समाजातील युवकांना मार्गदर्शन करणारे,दानशूर व्यक्तिमत्त्व अशी ओळख असणारे प्रकाश राऊत यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी सिंधुताई मुले दिपक राऊत, संदिप राऊत, डॉ. प्रदिप राऊत सिंगापूर, सुना नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.त्यांची अंत्ययात्रा आज मंगळवार दि.२७ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता त्यांच्या निवासस्थानावरून निघेल.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!