spot_img

आ.यशोमती ठाकूर यांच्या निधीतून पूर्ण झालेल्या आरोग्य केंद्राचे खा.नवनीत राणा यांनी केले उदघाटन

आ.यशोमती ठाकूर यांच्या निधीतून पूर्ण झालेल्या आरोग्य केंद्राचे खा.नवनीत राणा यांनी केले उदघाटन

◆खासदारांचा कंत्राटदारावर दबाव
◆श्रेय लाटण्याचा नवनीत राणा यांचा प्रयत्न

◆मिररवृत्त
◆अमरावती

लोकसभेची निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपली असतांना खा.नवनीत राणा यांनी गावागावात जाऊन विकासकामांचा शुभारंभ करण्याचा धडाका लावला आहे. श्रेय ओढवून घेण्याच्या नादात खा. नवनीत राणा नको त्या ठिकाणी जाऊन आणि कंत्राटदारांवर दबाव टाकून हे काम केंद्र सरकारचे असल्याचा बनाव करून स्वतःच उदघाटन करत फिरत आहेत. रविवारी शिराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुद्धा खा. नवनीत राणा यांनी उदघाटन करून एका विकासकामाचे श्रेय आपल्या नावावर करून घेतले विशेष म्हणजे हे काम तत्कालीन माजी जि.प. सदस्य अलका देशमुख यांच्या मागणीवरून आ. यशोमती ठाकूर यांनी पाठपुरावा करून पूर्ण केले.
अलका देशमुख यांनी २०१७ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत जर्जर झाल्यामुळे ही इमारत पाडून नवी इमारत बांधण्याचा प्रस्ताव सादर केला होता.त्यानंतर आ. यशोमती ठाकूर यांनी पालकमंत्री असतांना पाठपुरावा करून प्राथमिक आरोग्य केंद्र शिराळा येथील नव्या इमारतीसाठी निधी मंजूर करून घेतला होता अलीकडे या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्याने आ. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते इमारतीचे उदघाटन करण्याचे ठरले असतांना रविवारी खा.नवनीत राणा यांनी कामाचे श्रेय लाटून या नव्या इमारतीचे उदघाटन केले.शिराळा येथील नागरिकांना सुद्धा माहीत आहे की, आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी कुणी पुढाकार घेतला मात्र या कामाचे श्रेय दुसरेच कुणीतरी लाटत असल्याने गावकऱ्यांसह स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

◆पाच वर्षे केवळ नौटंकीपणा◆

खा. नवनीत राणा यांनी पाच वर्षे केवळ नौटंकीपणा करून प्रसिद्धीझोतात राहण्याचा प्रयत्न केला आणि आता निवडणुकीची वेळ आली तर मीच विकासकामे केली असे भासवत खा.महोदय ईतर आमदारांच्या कामांना आपले कामे दाखवून श्रेय लटण्याचा प्रयत्न करत आहेत. शिराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचे उदघाटन केल्यामुळे खा.नवनीत राणा यांच्यावर सर्वच स्तरातुन निषेध व्यक्त होत आहे.

●ऍड. अमित गावंडे
अध्यक्ष, काँग्रेस कमिटी अमरावती तालुका

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!