spot_img

सचिन ढगे यांच्या वाढदिवसा निमित्त गरीब महिलांना साडी, चोळी,चे वाटप,

सचिन ढगे यांच्या वाढदिवसा निमित्त गरीब महिलांना साडी, चोळी,चे वाटप,

◆मिररवृत्त
◆अमरावती

येथील सामाजिक कार्यकर्ते,विदर्भ रक्षक वूत्तपत्राचे संपादक,पत्रकार,लेखक, मल्हार फाऊंडेशन चे अध्यक्ष, केंद्रिय प्रेस असोसिएशन चे महाराष्ट्र अध्यक्ष, वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन चे राष्ट्रीय प्रवक्ते,भारतीय बहुउद्देशिय सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष, वीर बापू बिरू वाटेगावकर सेवा भावी संस्थेचे मार्गदर्शक,अहिल्यादेवी स्मारक समितीचे अध्यक्ष,सध्या महाराष्ट्रा सह अनेक राज्यात गाजत असलेला, व लोकप्रिय व वाचनीय असलेल्या ,दे दणका ,या सदर चे लेखक,अश्या अनेक सामाजिक संघटनांशी संबंधित असलेले सचिन ढगे यांचा वाढदिवस नुकताच विविध कार्यक्रम घेऊन संपन्न झाला.
कालिमाता मंदिर शक्ती पीठ,अमरावती येथील मंदिरात पूजा करून तसेच येथील गोरक्षण मधील गोमातेला चारा चारून,तसेच त्याच मंदिरा जवळील गोर गरीब महिलांना साडी ,चोळी,चे वाटप ,तसेच त्यांना काही आर्थिक मदत देऊन त्या गरीब माऊलींचे आशीर्वाद घेऊन त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला,या वेळी त्यांच्या सोबत अमरावती येथील माळी समाजाचे नेते डॉक्टर विजय कुबडे,माजी मुख्याध्यापक अमरसिंह ठाकूर,सुतार समाजाचे नेते,विजय भाऊ एरलेकर, ठाकूर समाजाचे नेते कैलाश भाऊ ठाकूर, विदर्भ राज्य आंदोलन पार्टीचे आशिष भाऊ देशमुख,हर्ष ढगे, खुशी ढगे,इत्यदिंची उपस्थिती होती,तसेच या वेळी त्यांच्या चाहत्यान कडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,तसेच त्यांनी संध्याकाळी केक कापून , नस्त्याचे आयोजन करून आपला वाढदिवस साजरा केला या वेळी त्यांना शुभेच्छा देण्या करीता अनेकांनी भेटी दिल्यात,सचिन ढगे हे आपलावाढदिवस दरवर्षी कोणता ना कोणता उपक्रम राबवून साजरा करत असतात,या पूर्वी त्यांनी अनेक विधवा महिलांना शिलाई मशीनचे वाटप केले होते,अनेक विद्यार्थांना शालेय साहित्याचे वाटप,तसेच त्यांना काही प्रमाणात आर्थिक मदत सुध्दा केली आहे, अंध व गरीब महिलांना साडी चोडी चे वाटप, वृद्धाश्रमात ब्लँकेट चे वाटप, वृद्धाश्रम व बाल आश्रमात , कपळे व खाऊचे वाटप,विद्यार्थांना बुक व पुस्तकांचे वाटप,तसेच शासकीय रुग्णालयात , टि.बी हॉस्पिटल येथे फळ व बिस्कीट वाटप,असे अनेक उपक्रम ते राबवित असतात, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मासाहेब जिजाऊ, मातोश्री अहिल्यादेवी होळकर, सावित्रीआई फुले,राष्ट्र संत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन ते हे सर्व सामाजिक कार्य करत असतात ,आपल्या कमाई मधील 20% रक्कम ते सामाजिक कार्यावर,गोर गरिबांना मदत करण्यासाठी खर्च करीत असतात,अश्या या सर्व जाती, धर्मातील, लोकांना आपलेसे मानणाऱ्या ,त्यांच्या मदतीला धाऊन जाणाऱ्या सचिन भाऊ ढगे यांचा वाढदिवस नुकताच विविध कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात आला.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!