spot_img

वक्तृत्व स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी मांडले प्रखर शिवचरित्र ,शिवमित्र परिवाराचे आयोजन, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

वक्तृत्व स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी मांडले प्रखर शिवचरित्र

◆शिवमित्र परिवाराचे आयोजन, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ

छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्य १९ फेब्रुवारी रोजी येथील संत काशिनाथ महाराज सभागृह येथे पार पडलेल्या वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत प्रखर शिवचरित्र मांडले. विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्वातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा संपूर्ण इतिहासच उपस्थितांसमोर उभा केला होता.दोन गटात पार पडलेल्या या स्पर्धेचे अ गटातून प्रज्ज्वल टोंगे प्रथम तर शेजल महानकर द्वितीय विजेते ठरले तर ब गटातून महेविष साजिर खान प्रथम व सौरभ गुळधे द्वितीय पुरस्काराचे मानकरी ठरले.
१४ ते १७ व १८ ते ३० अश्या दोन वयोगटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नांदगाव पेठ सह जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी या वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला होता.या शिवजयंती महोत्सवाला सरपंच कविता विनोद डांगे, ग्रा.पं. सदस्य छत्रपती पटके, बाळासाहेब राऊत, सामाजिक कार्यकर्ते राजेश बोडखे, प्रा. मोरेश्वर इंगळे, सार्वजनिक वाचनालयाचे सचिव राजन देशमुख, विलास अनासाने,संतोष गहरवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाआरतीने स्पर्धेला सुरुवात झाली.सरपंच कविता डांगे यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, अश्या कार्यक्रमांची खऱ्या अर्थाने आज गरज आहे, या स्पर्धेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येकांपर्यंत पोहचले पाहिजे असेही त्या यावेळी म्हणाल्या तसेच उत्कृष्ट नियोजनासाठी आयोजकांना शुभेच्छाही प्रदान केल्या.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आदर्श शिक्षक संदीप अकोलकर, राजा शिवछत्रपती परिवाराचे कोषाध्यक्ष उद्धव देशमुख हे होते. स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. आयोजन यशस्वी करण्यासाठी शिवमित्र परिवाराचे धीरज खोकले, ऋत्विक इंगोले, अमित डोईफोडे, नितीन पोटफोडे, रोशन डोईफोडे, प्रेम वैराळे, विशाल तायडे, वेदांशु खोकले, महेश दिहाडे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन पूर्वा चौधरी यांनी केले तर आभार धीरज खोकले यांनी मानले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!