शिवयंतीनिमित्त प्रहारची शिव – भीम मॅरेथॉन स्पर्धा
◆अबाल वृद्धांचाही सहभाग
◆आज रयतेला वाचविण्यासाठी खरी स्पर्धा – आमदार बच्चू कडू
◆मिररवृत्त
◆अमरावती
प्रहार जनशक्ती पक्ष अमरावती महानगर तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सोमवारी जिल्हा स्तरीय शिव – भीम मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. अमरावती जिल्हा अॅथलेटिक असोसिएशन अंतर्गत झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे ५३६ नागरिकांनी सहभाग नोंदविला. सकाळी ६ वाजता शिव टेकडी येथून सुरू झालेल्या या स्पर्धेला माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बच्चू कडू यांच्यासह पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी हिरवी झेंडी दाखविली.
यावेळी आमदार बच्चू कडू, पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, प्रमुख मार्गदर्शक प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाध्यक्ष छोटू महाराज वसू , अमरावती जिल्हा अथलेटिक असोसिएशनचे उत्तमचंद ठाकुर, नबील कुरेशी, अतुल पाटील, चेतक शेंडे, संचालक नवरदेव इथेनिक विक्की खत्री, प्रकाश उडवानी, रावसाहेब गोंडाणे, महानगर प्रमुख बंटी रामटेके आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार बच्चू कडू यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, रयतेचा राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांची आज गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेसाठी प्रयत्न केले. कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, सामान्य नागरिकांना न्याय मिळावे, यासाठी रयतेचे राज्य निर्माण केले. शिव – भीम मॅरेथॉन स्पर्धा ही अशीच आगळी वेगळी स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जनतेला एकता, अखंडतेचा संदेश गेला आहे. आजच्या परिस्थितीत जाती धर्माच्या राजकारणात सर्वधर्मसमभाव ही पूर्णतः विसरून गेली आहे. आज शिव – भीम यांचे आचार विचार समाजापर्यंत पोहचविण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. धर्मनिरपेक्ष लोकशाही वाचविण्यासाठी ही आज दोड, मॅरेथॉन, स्पर्धा आहे, जी देशात एकता आणि अखंडता कायम राहील. आज रयतेला वाचविण्यासाठी खरी स्पर्धा आहे. असे प्रतिपादन आमदार बच्चू कडू यांनी केले.
यावेळी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी मार्गदर्शन करतांना सांगितलं की, आज देशाला धर्मनिरपेक्ष लोकशाही ची गरज आहे. समाजामध्ये शांतता, सुव्यवस्था अबाधित राहील. यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये, यासाठी नागरिकांनी प्रयत्न करावा. शिव – भीम मॅरॅथॉन ही आगळी वेगळी स्पर्धा घेण्यात आली. प्रहार जनशक्ती पक्ष महानगराच्या वतीने राबविण्यात आली. ही अतीशय गौरवाची बाब आहे. आज समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जनतेने पुढे यावे. असे आवाहन पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी केले.
तसेच महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी मार्गदर्शन करतांना सांगितलं की, आज सर्व समाजातील युवा, नागरिकांनी एकत्र यावे. शिव आणि भीम शक्ती एकत्र आली तर समाजात एकोपा निर्माण होईल. आज त्याची गरज आहे. शहरासह जिल्ह्यातील युवा वर्गानी चांगला मार्ग निवडावा. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे विचार अंगिकरायला पाहिजे. त्यामुळे देश ,समाज पुढे जाईल. असे प्रतिपादन बंटी रामटेके यांनी केले.
ही मॅरेथॉन पुरुषांसाठी शिवटेकडी – रेल्वे स्टेशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विन) गर्ल्स हायस्कूल चौक- कलेक्टर ऑफिस-बियाणी चौक-कॅम्प कॉर्नर सुंदरलाल चौक ते शिव टेकडी असा मार्ग होता तर महिलांसाठी शिवटेकडी – रेल्वे स्टेशन चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विन) गर्ल्स हायस्कूल चौक, नेक्स्ट लेवल मॉल, पोलीस पेट्रोल पंप शिव टेकडी असा होता. पुरुषांसाठी ५ किलोमीटर तर महिलांसाठी ३ किलोमीटर अंतर होते. पहिल्या ६ स्पर्धकांना रोख बक्षिसे व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
यावेळी मुख्य आयोजक प्रहार शहर संपर्क प्रमुख गोलू पाटील, शहर महासचिव अभिजित गोडाणे , शहर संघटक श्याम इंगळे, उप महानगर प्रमुख सुधीर मानके, शहर सचिव, आशिष राजनेकर, ऋषभ मोहोड, धीरज पिंजरकर, अजय तायडे, कुणाल खंडारे , प्रकाश उधवणी, आशिष रामेकर, वृषभ मोहड,धिरज पिंजरकर, अमन गौरवे, सुमित कुंभारे, प्रतिक गोंडाणे, सचिन सवई, नंदू वानखेडे, विशाल ठाकूर, आकाश जगडदे, राम करुले, शाम राऊत, प्रदीप जैस्वाल, मुकेश गुंडीयाल, ओम गुलमाने, अंकुश पंचवटे आदी उपस्थित होते.
●यांनी मिळविला विजय●
शिव भीम मॅरेथॉन स्पर्धेत महिला गटातून प्रणाली शेगोकार, सलोनी लव्हाळे,दीपा उईके, गायत्री डांगे,आरती भोयरे,पायल मगरदे
तर पुरुष गटातून सौरभ तिवारी छगन बोंबले प्रशिक थेटे,संजय पटेल, राकेश बेठे, मुकेश धनगर यांनी विजय मिळवला.