spot_img

ब्रिजलाल बियाणीच्या रासेयो पथकाचे दाढी येथे श्रमसंस्कार शिबीर ,विद्यार्थ्यांच्या वतीने शिवजयंती साजरी

ब्रिजलाल बियाणीच्या रासेयो पथकाचे दाढी येथे श्रमसंस्कार शिबीर

◆विद्यार्थ्यांच्या वतीने शिवजयंती साजरी

◆मिररवृत्त
◆अमरावती

ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय अमरावतीच्या रासेयो पथकाच्या वतीने भातकुली तालुक्यातील दाढी येथे श्रमसंस्कार शिबीर राबविण्यात आले.विविध सामाजिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन मोठ्या उत्साहात शिवजयंती सुद्धा साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून वाय डी वी.डी. कॉलेज तिवसा येथील प्राचार्य डॉ.एच.आर देशमुख तसेच अध्यक्ष म्हणून ब्रजलाल बियानी शिक्षा समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश लढ्ढा यांची उपस्थिती होती. तसेच प्रमुख अतिथी म्हणून ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दीपक धोटे,पुरुषोत्तम लढ्ढा,ठाकूरदास लढ्ढा,दाढी येथील सरपंच सौ.मनीषा नकाशे,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक के.डी.गुल्हाने, उपसरपंच सुजाता तेलमोरे, माजी सरपंच गोपाळराव येवले,पोलीस पाटील राजू तेलमोरे,कैलाश तेलमोरे ,सुनीता येवले व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सोनल मुंदडा यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर दाढी येथे आयोजित करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून त्यांना सामाजिक कार्याचा सराव करण्यास वाव देणे हे असल्याचे त्यांनी सांगितले.महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करणे, क्रीडांगण तयार करणे, ग्रामीण विभागातील रस्ते साफ करणे, प्रौढ शिक्षण,गलिच्छ वस्त्यांची सफाई, प्रथमोपचार,नागरी संरक्षण इत्यादी कार्यक्रमाचा या योजनांमध्ये योजनांमध्ये समावेश असल्याबाबत डॉ. मुंदडा यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. एच.आर.देशमुख यांनी विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्टीचे नियोजन कसे करावे हे शिवाजी महाराजांचे उदाहरण देऊन योग्यरीत्या पटवून दिले. शिवजयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सुद्धा साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रम आधिकारी डॉ. सोनल मुंदडा,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सागर कुथे व सुरज हेरे यांचेसह रासेयो स्वयंसेवकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!