spot_img

भारतीय लोकशाही समोरील आव्हाने या विषयावर प्रा.श्याम मानव यांचे जाहीर व्याख्यान

भारतीय लोकशाही समोरील आव्हाने या विषयावर प्रा.श्याम मानव यांचे जाहीर व्याख्यान

●शिव,फुले,शाहू,आंबेडकर विचार मंच व काँग्रेस चे आयोजन

◆मिररवृत्त
●नांदगाव खंडेश्वर

स्थानिक शिव,फुले,शाहू,आंबेडकर विचार मंच व काँग्रेसच्या वतीने येथील जुन्या आठवडी बाजारात भारतीय लोकशाही समोरील आव्हाने या विषयावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.शाम मानव यांचे जाहीर व्याख्यान पार पडले. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या जनविरोधी व शेतकरी विरोधी धोरणाबाबत सडकून टीका केली. तसेच शिवकालीन इतिहासापासून तर महाराष्ट्राची परंपरा, लोकशाही समोरील आव्हाने व सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सविस्तर प्रकाश टाकला.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी माजी आ. वीरेंद्र जगताप,माजी आ. ज्ञानेश्वर धांने पाटील, कॉम्रेड तुकाराम भस्मे, बाळासाहेब राणे, प्रकाश मारोटकर,अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे, सचिव हरीश देशमुख, सागर दुर्योधन ही मंडळी मंचावर होती. माजी आमदार वीरेंद्रजी जगताप यांनी अध्यक्षीय भाषणमध्ये शेतकऱ्यांच्या हमीभावाबाबत मोदी सरकारने दिलेल्या गॅरंटीचे काय झाले असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
संचालन डॉ.संजय जेवडे यांनी केले तर प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर यांनी केले.शहर काँग्रेसचे अध्यक्ष अमोल धवसे यांनीब उपस्थितांचे आभार व्यक्त केले यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष निशांत जाधव,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव परीक्षित जगताप, विठ्ठलराव चांदणे देविदास सुने,कान्तेश्वर जाधव,सुनील मेटकर,शिवसेना उपजिल्हा संघटक ओंकार ठाकरे,ईद्रीसभाई,सीमाताई जाधव, सरफराज पठाण,शेख हारूण, गजानन मारोटकर, मुमताजभाई, दीपक भगत, विनोद चौधरी, दीपक सवाई,समीर दहातोंडे, गौतम सोनोणे, राजेंद्र सरोदे, रमेश ठाकरे,ज्योतपाल चवरे, विशाल रिठे, धनराज इंगोले, गजानन भडके, पांडुरंग कावळे, अजय भोयर, दिनेश धवस, सविताताई रंगारी, आशिष शिरभाते, तनवीर पटेल, उमेश सोनोणे, गोपाल लाड, प्रशांत देशमुख, विजय चींचे, विक्रम झाडे शहरातील व तालुक्यातील मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिव,फुले,शाहू,आंबेडकर विचार मंच व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!